समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्ग

  • औद्योगिक वसाहत, मेडीकल कॉलेज, दवाखाना, स्मार्ट सीटी, शैक्षणिक वसाहत, उभारणार गावाशेजारी

वर्धा (Wardha).  विरुळ आकाजी येथून जवळच गेलेल्या नागपूर-मुंबई या समरुध्दी महामार्गाचे काम कोरोणाच्या संकटताही युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील वर्षांपर्यंत या महामार्गावर वाहनांची रांग लागनार असल्याची माहिती आहे.एकदा हा मार्ग सुरू झाला की विरुळ परीसरातील विरुळ सहीत अनेक गावांचे रुप पालटुन परीसरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

विरुळ पासून अगदी हाकेच्या अंतरावर अर्धा कीलोमीटरवरुन हुसेनपुर बोरी बार्हा शिवारातुन समरूध्दी हा महामार्ग गेला आहे. या मार्गावरील विरुळ ,रसुलाबाद, हुसेनपुर, बोरी बार्हा, निजामपूर, टाकळी,पिंपळगाव या गावाच्या अगदी शेजारुन हा महामार्ग गेला आहे.नागपुर वरुन पहीला थांबा व मुंबई वरुन येनार्या वाहनांचा शेवटला थांबा विरुळ परीसरात दील्याने या भागाचे महत्त्व वाढले आहे.तसेच विरुळ परीसरातील गावांना लागुनच स्मार्ट सीटी टाऊन सीटी ऊभारन्याचे काम सुरू आहे.त्यामुळे या परीसरातील खाली जमीनीवर मोठ मोठाले औद्योगिक वसाहत, शैक्षणीक वसाहत वखार महामंडळ विमानतळ व इतर्त्र मोठे उद्योग उभे राहणार आहेत.

या विरूळ परीसरातील गावांना व येथिल जमीनिंना विषेश महत्व प्राप्त झाले आहे. नागपुर ते मुंबई पासून चे मोठे बील्डर या भागातील जमीन खरेदी साठी विरुळ परीसरातील शेतकऱ्यांचे भेटी घेत आहे. समरूध्दी महामार्ग हा विरुळकरांसाठीव परीसरातील गावांसाठी वरदान ठरलेल्या असुन भविष्यात मोठ्या ऊलागडी व व्यवसाय येथुन सुरुवात होईल व तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

कुरझडी मातेच्या मंदिरात पडणार सौंदर्यीकराणात भर
-- समृद्धी महामार्गावरील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले उंच टेकडीवर अनेकांचे श्रद्धाधाध असलेले कुरझडी. भवाणी मातेचे मंदिर हे फार पुरातन काळापासून येथे वसलेले आहे. या मंदीराला लागुनच मोठा तलाव आहे. आता पर्यंत अनेक पर्यटकांनी या मंदिरात येऊन माथा टेकला आहे. समरूध्दी महामार्गाच्या अगदी जवळच असलेल्या या मंदिराच्या सौंदर्यीकरणातही भर पडणार आहे.