प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शासनाने तुरीला सहा हजार तर चण्याला 5 हजार 100 रुपये हमी भाव घोषित केला आहे. 270 शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता बाजार समितीत नोंदणी केली आहे. परंतु, खुल्या बाजारात अधिक भाव असल्याने ते संदेश पाठवुनही तूर विक्रीसाठी आणत नाही.

    हिंगणघाट (Hinganghat).  शासनाने तुरीला सहा हजार तर चण्याला 5 हजार 100 रुपये हमी भाव घोषित केला आहे. 270 शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता बाजार समितीत नोंदणी केली आहे. परंतु, खुल्या बाजारात अधिक भाव असल्याने ते संदेश पाठवुनही तूर विक्रीसाठी आणत नाही. सध्या चण्याला हमी भावापेक्षा कमी भाव देण्यात येत आहे. परंतु, शेतकऱ्यांनी हमी भावानेच चण्याची विक्री करावी, असे आवान बाजार समितीचे सभापती Adv. सुधीर कोठारी यांनी केले आहे.

    बाजार समितीत चणा विक्रीसाठी 805 शेतकऱ्यांनी चणा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. लवकरच बाजार समितीत चणा खरेदीला सुरवात होणार आहे. ज्या चणा उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही. त्यांनी बाजार समितीत नोंदणी करावी. कोरोना आजाराचे संकट पाहता संदेश आल्यानंतरच शेतमाल विकण्यासाठी आणावा.

    ज्या शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. किंवा माल साठवणुकीसाठी जागा नाही. परंतु, आधारभुत किमतीने माल विकायचा आहे. त्यांनी वखार महामंडळाचे गोदामात शेतमाल ठेवावा. यावर 75 टक्के रक्कम 6 टक्के व्याजाने देण्यात येणार आहे. सहा महिन्यात माल उचलल्यान गोदामाच्या किरायाची अर्धी रक्कम बाजार समिती भरणार आहे. शेतकऱ्यांनी या तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभपती अॅड. सुधीर कोठारी यांनी केले आहे.