Seven die of corona disease in Wardha; 112 Newly infected
कोरोना विषाणू

  • कोरोना संक्रमितांचा आकडा पोहोचला २७४१ वर
  • आतापर्यत ६१ जणांचा मृत्यू
  • १३१३ एक्टीव रूग्णांवर उपचार सुरू

वर्धा (Wardha). जिल्ह्यात कोरोना आजाराचे संक्रमण थांबण्याचे नाव घेत नाही. सोबतच मृतकांचाही आकडा वाढत आहे. मंगळवारी पुन्हा ११२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. सोबतच सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतकांची संख्या ६१ वर गेली आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर मंगळवारी ५६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

मंगळवारी मिळालेल्या कोरोनाबाधितांमध्ये वर्धेत सर्वाधिक ५३ बाधितांचा समावेश आहे. त्यात ४० पुरुष, १३ महिलांचा समावेश आहे. देवळीत २१ संक्रमितांपैकी १८ पुरुष, ३ महिला आहे. सेलू २ पुरुष, आर्वीत २ पुरुष १ महिला, आष्टीत ३ पुरुष व एक महिला कोरोनाबाधित आहे. समुद्रपुरात दोन पुरुष, हिंगणघाटमध्ये २७ संक्रमित असून १७ पुरुष १० महिलांचा समावेश आहे. मृतकांमध्ये पुलगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, वर्धेतील ६५, ५० व ४९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जामणी गोजी येथील ७० वर्षीय पुरुष, हिंगणघाट येथील ५४ वर्षीय महिला व कारंजा येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७४१ वर पोहोचली आहे. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ६१९ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. एकूण १३६७ कोरोनामुक्त झाले असून १३१३ ऍक्टिव्ह रूग्णावर उपचार सुरू आहे. मंगळवारी ८१६ जणांना आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकूण २७९८० जणांचे स्वॅब पाठविण्यात आले. त्यापैकी २७९२२ जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ५८ जणांचा अहवाल प्रलंबित आहे.