अवैध वाळूची वाहतुक करणारे सात ट्रक जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अवैधरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत सातही ट्रक जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने २६ मार्चच्या मध्यरात्री मौजा करंजी भोगे गावाजवळ करण्यात आली.

    वर्धा (Wardha).  अवैधरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत सातही ट्रक जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने २६ मार्चच्या मध्यरात्री मौजा करंजी भोगे गावाजवळ करण्यात आली. मांडगावकडून सेवाग्राम रोडने एकामागे एक असे सात ट्रक येत असल्याचे दिसून आले.

    सदर ट्रक थांबवून पाहणी केली असता सातही ट्रकमध्ये प्रत्येकी अंदाजे ३०० फुट प्रमाणे एकूण अंदाजे २१०० फुट काळी ओली रेती भरुन असल्याचे आढळून आले. ट्रकचालकांना वाळूच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे आढळून आले.

    सदर सातही ट्रक पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे जमा करुन पुढील कार्यवाहीकरीता तहसिलदार, वर्धा यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलिस उपनिरीक्षक सौरभ घरडे, पोलिस अंमलदार अशोक साबळे, निरंजन वरभे, हमिद शेख, संतोश दरगुडे, रणजित काकडे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, अनिल कांबळे, अविनाश बनसोड, प्रदीप वाघ, अमोल ढोबळे यांच्या पथकाने केली.