प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गतवर्षी नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे ( 10th exam) आवेदनपत्र भरलेच नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी (students) गेले कुठे, असा प्रश्न शिक्षकांना (the teachers) सतावतो आहे.

  नंदोरी (Nandori).  गतवर्षी नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे ( 10th exam) आवेदनपत्र भरलेच नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी (students) गेले कुठे, असा प्रश्न शिक्षकांना (the teachers) सतावतो आहे. गतवर्षापासून राज्यात कोरोनामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (schools and junior colleges) वर्षभर बंद ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. कोरोनामुळे बहुसंख्य पालकांना रोजगार, नोकरी गमवाव्या लागल्या.

  त्यामुळे त्यांनी विविध ठिकाणी स्थलांतर करण्यास प्राधान्य दिले. यामुळे बहुसंख्य मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर‌ राहिले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबविली. यात प्रामुख्याने ६ ते १४ वयोगटातील मुलांचा शोध घेतला. या सर्वेक्षणातून राज्यात सुमारे २५ हजार २०४ मुले प्रत्यक्षात शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.

  कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल लावण्याची कार्यपद्धतीही शासनाने जाहीर केली आहे. हे करत असताना या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीच्या विषय निहाय निकालातील पन्नास टक्के गुण दहावीच्या निकालाच्या मूल्यमापनात ग्राह्य धरण्यात येणार आहे. शाळांनी सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांच्या निकालाची नोंदवलेली माहितीच अधिकृत धरण्यात येणार आहे. यादृष्टीने शिक्षण विभागाने राज्याच्या नववीच्या एकूण निकालाबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. मात्र, यातून अजबच माहिती समोर आली आहे.

  राज्यात २०११ मध्ये एकाच दिवशी पटसंख्या पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यात राज्यात अनेक बोगस शाळा आढळल्या. यावर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने सरल प्रणालीचा अंगीकार केला. सरल प्रणालीत शाळांनी दर्शविलेल्या विद्यार्थिसंख्येनुसार, शाळांना संचमान्यता मिळते. हे सर्व खरे असले तरी राज्यात दरवर्षी नववीपर्यंत विद्यार्थिसंख्या असलेले विद्यार्थी नेमके दहावीत कुठे जातात? नववीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी काही अपवाद वगळता ९७-९८ टक्के विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरायलाच पाहिजे.

  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरलेच नाही. हे यंदाचे ठिक आहे; परंतु दरवर्षी राज्यातील नववीतील उत्तीर्ण झालेले लाख-दोन लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरत नाहीत. मग हे विद्यार्थी जातात तरी कुठे, यावर राज्याचे शिक्षण विभागाने विचार करण्याची गरज आहे.

  १९ लाखांपैकी १६ लाख विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज
  २०१९-२० मध्ये राज्यात नववीसाठी १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २४ हजार १०७ विद्यार्थी नापास झाले होते. दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. उर्वरित विद्यार्थ्यांनी अर्जच भरले नाहीत. मग हे अर्ज न भरलेली मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने शाळेच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.