वन वसाहतीतून चंदनाची तस्करी; विष्ठा करून झोपडपट्टीमार्गे काढला पळ

येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वन वसाहतीत असलेले चंदनाचे झाड शनिवारी रात्री चोरुन नेले. त्यामुळे वन वसाहतीतच चंदन तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. कुंपनाच्या आत असलेले चंदनाचे झाड चंदन तस्कराने चोरी करून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    आष्टी (शहीद) Ashti (Shahid):  येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वन वसाहतीत असलेले चंदनाचे झाड शनिवारी रात्री चोरुन नेले. त्यामुळे वन वसाहतीतच चंदन तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. कुंपनाच्या आत असलेले चंदनाचे झाड चंदन तस्कराने चोरी करून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    रात्रपाळीत असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी आष्टी येथील पोलिस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीनुसार ६० से. मी. गोलाई, 20 से. मी. थुट असलेले व ०.००९८ घनमीटर असलेले अंदाजे २५ हजार रुपये किमतीचे झाड होते. चौकीदार नेहमीप्रमाणे पहाटे साडेचार वाजता उठून आपल्या दैनंदिन कामे करत असताना सकाळी 7.15 ही बाब उघडकीस आली.

    त्यानंतर वनरक्षकाना दूरध्वनीवरून माहिती दिली असता त्यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यात बुंध्याचा भाग चोरून नेला असून चंदनाच्या झाडाचा वरचा भाग पडलेल्या अवस्थेत असल्याचे नमूद केले आहे. तर काही अंतरावर चंदन तस्करांनी विष्ठा करून इंदिरानगर झोपडपट्टीर्गे येऊन पळून गेल्याचे म्हटले आहे. चंदनाचे झाड जाळी वाकून आणि आरीच्या साह्याने कापून नेल्याचे म्हटले आहे. वन कर्मचारी पेट्रोलिंगवर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चंदनाच्या झाडावर हात साफ केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील तपास करीत आहेत.