आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या निकाली काढा; आंजी येथे आंदोलन

पवनार येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी उत्कृष्ट काम करीत असूनही त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. याचा निषेध करीत ३ मे रोजी एक दिवशीय कामबंद आंदोलन करण्यात आले. सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात.

    आंजी (Anji).  पवनार येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी उत्कृष्ट काम करीत असूनही त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. याचा निषेध करीत ३ मे रोजी एक दिवशीय कामबंद आंदोलन करण्यात आले. सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात, या मागणीकरिता आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी आंजी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय कामबंद आंदोलन केले.

    पवनार येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. रश्मी कपाडे उत्कुष्ट काम करीत आहे. त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने नाहक त्रास देण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एनसिडी कार्यक्रमात पवनार नंबर एकवर आहे. डॉ. रश्मी कपाडे यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. तरी त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने मानसिक त्रास देण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करण्यात आला.

    सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांना अॅन्टीजेन तपासणी करणे बंधनकारक करू नये. आरटीपीसीएर शिबिराची सक्ती करणे बंद करण्यात यावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्सव शेंडे, उपाध्यक्ष नीता चन्ने, जिल्हा सचिव सागर बोंबले, संदीप लेकुरवाळे, वीणा वासनिक, अक्षय इंगळे, डॉ. शैलजा काळे, डॉ. महेंद्र डांगे, डॉ. रश्मी कपाळे, डॉ. आश्लेषा बल्लाळ, डॉ. वैशाली आसोले, डॉ. अक्षय इंगळे, डॉ. पुनम पाली, डॉ. दक्षता ढोके, डॉ. धनश्री कोरडे सहभागी झाले होते.