सोयाबीन
सोयाबीन

अस्मानी संकट, सदोष बियाणे यामुळे यंदा सोयाबीनला फटका बसला आहे. दरवर्षीपेक्षा सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे. यामुळे बाजारात हमी भावापेक्षा जास्त भाव भेटत असतांना सुद्धा शेतक-यांनी बाजारात पाठ फिरवली आहे. कापूस पिकानंतर नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या पिकाकडे शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून वळला. यावर्षी १ लाख ३८ हजार हेक्टरात सोयाबीनची पेरणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

वर्धा (Wardha). अस्मानी संकट, सदोष बियाणे यामुळे यंदा सोयाबीनला फटका बसला आहे. दरवर्षीपेक्षा सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे. यामुळे बाजारात हमी भावापेक्षा जास्त भाव भेटत असतांना सुद्धा शेतक-यांनी बाजारात पाठ फिरवली आहे. कापूस पिकानंतर नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या पिकाकडे शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून वळला. यावर्षी १ लाख ३८ हजार हेक्टरात सोयाबीनची पेरणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

सोयाबीनची पेरणी सुरुवातीला केल्यानंतर अनेक शेतक-याचे सोयाबीन उगवलेच नाही. सदोष बियाणांमुळे अनेक शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. हात उसणे पैसे आणून शेतक-यांनी पुन्हा दुबार पेरणी केली होती; परंतु यंदाच्या पावसाळा शेतक-यांसाठी संकट घेऊन आला. सोयाबीन काढणीच्यावेळी सतत पाऊस राहिल्याने अनेकांना सोयाबीन संवगणीचे काम सुद्धा पडले नाही. संवगणी केलेल्या सोयाबीनमध्ये सुद्धा कोंब फुटली होती. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. एकरी पाच ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन सरासरी होत असते. परंतु, यावर्षी एकरी एक पोते ते पाच पोत्यापर्यंत सोयाबीनचे शेतक-यांना उत्पन्न झाले.

यंदा सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ८५० सरकारने जाहीर केल्यानंतर उच्च दर्जाच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा ६०० रुपये एका क्विंटल मागे शेतक-याला अतिरिक्त रक्कम मिळत आहे. तरीसुद्धा शेतकरी बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीला आणत नाही. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समीर पेंडके यांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज एक हजार पोत्यांची आवक या दिवसांमध्ये होत होती. ती आता तीनशे ते चारशे पोत्यांवर येऊन थांबली आहे. नोव्हेंबर महिन्यात फक्त ४ हजार ५०० सोयाबीनची आवक झाली. यंदाच्या हंगामात २० हजार क्विंटल बाजार समितीत शेतक-यांनी सोयाबीन विक्रीला आणले.

सोयाबीनचा दर्जा यावर्षी चांगला नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यामुळे काही शेतक-यांना प्रतवारी पाहून व्यापारी भाव देण्यात येत आहे. बियाणे करीता साठवून ठेवले सोयाबीन यावर्षी सदोष बियाणे बाजारात विक्रीला आल्यामुळे शेतक-यांनी सोयाबीन पुढील वर्षाकरिता बियाणे म्हणून साठवून ठेवले आहे. धोका पत्करणे पेक्षा स्वतः जवळचे बियाणे वापरलेले बरे या भावनेतूनच त्यांनी चांगल्या प्रतीचे बियाणे ठेवले आहे.