संपूर्ण कार जळून राख
संपूर्ण कार जळून राख

वर्धा जिल्ह्यातील गिरडच्या बाबा फरीद टेकडीवरील हिरणी दर्ग्याजवळ धावत्या कारने पेट घेतला. ही घटना गुरूवार 10 डिसेंबर रोजी 2 वाजताचे दरम्यान घडली. सुदैवाने कुठलेही जीवित हानी झाली नाही. गिरड येथील टेकडीवरील बाबा फरीद दर्ग्यावर काही भाविक एम. एच. 32 वाय 3448 क्रमांकाच्या कारने जात होते. दरम्यान वाटेत अचानक कारने पेट घेतला.

गिरड (Girad). वर्धा जिल्ह्यातील गिरडच्या बाबा फरीद टेकडीवरील हिरणी दर्ग्याजवळ धावत्या कारने पेट घेतला. ही घटना गुरूवार 10 डिसेंबर रोजी 2 वाजताचे दरम्यान घडली. सुदैवाने कुठलेही जीवित हानी झाली नाही. गिरड येथील टेकडीवरील बाबा फरीद दर्ग्यावर काही भाविक एम. एच. 32 वाय 3448 क्रमांकाच्या कारने जात होते. दरम्यान वाटेत अचानक कारने पेट घेतला.

ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकासह प्रवाशी कारखाली उतरल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. हिंगणघाट येथील तुकडोजी महाराज वार्डात राहणारे यादव सखाराम तुराळे आपल्या कुटुंबासह शेख फरीद बाबांच्या दर्शनासाठी आले होते.

गिरड येथील टेकडीवर जात असतांना रस्त्याच हिरणी दर्गा जवळ अचानक गाडीने पेट घेतला. पाहता पाहता संपूर्ण कार खाक झाली. कारमध्ये दोन महिला व दोन पुरुष बसले होते. कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच ते खाली उतरले. यामुळे कुठलिही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान तासभरात वाहतुक सुरळीत करण्यात आली.