वर्धेचे खासदार रामदास तडस आणि खेळाडू
वर्धेचे खासदार रामदास तडस आणि खेळाडू

वर्धा (Wardha) : मनुष्य हा मातीशी जुळून असणे अती आवश्यक आहे. खेळ खेळणे हे शारीरिक व मानसिक दृष्टया गरजेचे आहे. खेळ खेळल्याने त्यांचे शरीर सुदृढ, बलवान व निरोगी राहते. युवक कुठल्याही व्यसनाच्या आहारी जात नाही. देवळी तालुका स्तरावर एक मोठे व संपुर्ण सर्व सोई सुविधा उपलब्ध असलेले स्टेडीयम निर्माण करण्यामागे येथे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, हा उद्देश आहे. या खेळाडूच्या नेहमीच पाठीशी मी उभा राहील.

वर्धा (Wardha) : मनुष्य हा मातीशी जुळून असणे अती आवश्यक आहे. खेळ खेळणे हे शारीरिक व मानसिक दृष्टया गरजेचे आहे. खेळ खेळल्याने त्यांचे शरीर सुदृढ, बलवान व निरोगी राहते. युवक कुठल्याही व्यसनाच्या आहारी जात नाही. देवळी तालुका स्तरावर एक मोठे व संपुर्ण सर्व सोई सुविधा उपलब्ध असलेले स्टेडीयम निर्माण करण्यामागे येथे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, हा उद्देश आहे. या खेळाडूच्या नेहमीच पाठीशी मी उभा राहील. योग्य मार्गदर्शन व नियमित सरावानेच स्पर्धेत यश गाठता येते. यासाठी सर्वाना मेहनत घ्यावी, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

विदर्भ केसरी रामदास तडस इनडोअर स्टेडीयम देवळी येथे कराटे युनिवर्सल स्पोर्टस मास्टर असोसियशन वर्धा डिस्ट्रीक्ट महाराष्ट्र व्दारा आयोजित ऑल इंडिया ओपन ऑनलाईन काटा ई- टुर्नामेंटचे पुरस्कार वितरण व अभिनंदन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला नगर पालिकेचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, एल.टी.एस.के.आयचे राष्ट्रीय सचिव उल्हास वाघ, क्रीडा मार्गदर्शक राजू बानमारे, क्रीडा मार्गदर्शक सुरेंद्र गांडोळे प्रामुख्यान उपस्थित होते. स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे नॅशनल कराटे ट्रेनिंग सेंटर ब्लॅक कमांडो मार्शल आर्ट असोएिशन संलग्नित लॉयन्स ट्रेडीशनल शोतोकाल कराटे असो. इंडियाच्या वतीने देवळी ब्रॅंच सेन्साई अनुपकुमार, सेन्साई राजू महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले.

खासदार रामदास तडस म्हणाले की, आज भारत एकविसाव्या शतकात पदार्पण करत प्रगतीपथावर आहे. पण, आजही स्त्रियांवर होणा-या अत्याचारांच्या बातम्यांची संख्या कमी होत नाही. आजही भारतात स्त्रियांवर विनयभंग, बलात्कार, घरगुती हिंसा, हुंडाबळी यासारख्या घटना होतात. सरकारने महिला सुरक्षेसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने स्त्रियांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलिस दल निर्माण केले. त्यांना आपात्कालीन नंबर देण्यात आला. विविध अॅप तयार केले. पण, त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. स्त्रियांच्या संरक्षणासाठी प्रथम स्त्रियांनी सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्त्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे खासदार तडस यांनी सांगितले.

सामन्यांतील यशस्वी विद्यार्थी आर्या ठाकरे, साक्षी कांबळे, कृपा देशमुख, अभिजीत देशकर, प्रश्वर देशमुख, राज बोरकुटे, सुजल थुटे यांना मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. न.प.उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविक उल्हास वाघ यांनी केले. संचालन सायली वाघट यांनी केले. आभार राजेश वाघमारे यांनी मानले. आयोजनाकरिता धनंजय कपूर, रामसिंग ठाकूर, विजय घोंगडे, संजय खानखुजे,सरेश बैन, सुदाम पारीसे, संजय झिलपे, सलीम शेख, भुषण महाजन,साहिल वाघ, कनिजा खान, युवराज पाहुणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हयातील कराटेपटू उपस्थित होते.