बीएससी, एमबी झालेल्या युवकाने थाटली चहा कॅन्टींन; ७०० रूपयांची दररोजची मिळकत

वर्धा़ (Wardha):  कोरोना संकटाचे काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याने ते बेरोजगार झाले आहे. यातच पुणे येथील कंपनीत व्यवस्थापक पदावर असलेल्या बीएससी व एमबीए उत्तीर्ण युवकाचा रोजगार गेला. परंतु, त्याने हताश न होता वर्धेत चहा कॅन्टींग सुरू केली. यातुन दररोज 700 रूपयांची मिळकत होत आहे. यातुन कुटुंबाचा गाढा चालविण्यात येत आहे. उच्च विद्याविभुषित युवकाचे कार्य अन्य युवकांना प्रेरणा देणारे आहे. बेरोजगारी ही आपल्या देशातील सगळयात मोठी समस्या आहे. यामुळे उच्च विद्याविभुषित युवकांनी रोजगार मागणारे न होता रोजगार देणारे बनावे. युवकांनी स्वयंरोजगार करून स्वावलंबी बनावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते सगळयांनाच शक्य होत नाही. परंतु, भारत डोंगरे नामक 33 वर्षीय युवकाने शक्य करून दाखविले.

भारत डोंगरे हा मुळचा अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुर या गावाच रहिवाशी आहे. घरी आई- वडिल व लहान भाऊ रवी असे कुटुंबीय आहे. वडील मजूरी करीत असल्याने परिस्थिती बेताचीच होती. अशाही परिस्थितीत भारतने गावापासून 10 किलोमीटर दूर असलेल्या कारंजा गावात असलेल्या जिजामाता विद्यालयात दहावी पर्यतचे शिक्षण घेतले. येथूनच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर अकोला येथील शिवाजी कॉलेजमधून बीएससीची पदवी उत्तीर्ण केली. पुणे येथे झेडजीव्हीटी कंपनीत नोकरी सुरू केली. पाच वर्ष या कंपनीत काम केल्यानंतर टेक्नो फोर्स कंपनीत काम सुरू केले. यानंतर 2017 मध्ये भारतचा विवाह झाला. पत्नी प्रियंका ही गडचिरोली जिल्ह्यातील मुधोली गावची राहणारी आहे. यानंतर पुणे विद्यापीठातून 2018 मध्ये एमबीए(ऑपरेशन)ची परीक्षा देखील उत्तीर्ण केली. यानंतर भारतला लक्ष्मी व्हॅक्युम मेटार्जीकल कंपनी पणे येथे क्वालिटी कंट्रोल मॅनेजरची नोकरी मिळाली. 35 हजार रूपये मासिक वेतन होते. भारत सोबत लहान भाऊ रवी देखील पुण्यालाच होता. त्याने गावात बारावी पर्यत शिक्षण घेतले. तो देखील पुणे येथे चहा कंपनीत कामाला होता. परंतु, जून महिन्यापासून कोरोना संकटामुळे भारतला नोकरी गमावावी लागली. यामुळे गावी अकोला येथे असलेल्या आई-वडिलांकडे भावासह परत आला.

पगारातून काही रक्कम तो आई- वडिलांना पाठवित होता. परंतु, रोजगार नसल्याने कुटुंबाचा गाएा चालविणे कठीत झाले. त्यामुळे अकोल्यात काही दिवस रोजगार शोधला परंतु, रोजगार मिळाला नाही. यामुळे रोजगार शोधण्यासाठी तो वर्धेत नातेवाईकांकडे आला. पुण्यातच नाही तर वर्धेसारख्या लहान शहरात रोजगार मिळणेही कठीणच होते. रोजगार न मिळाल्याने काही तरी उद्योग सुरू करावा, असा विचार केला. लहान भाऊ रवी चहा कंपनीत कामाला असल्याने चहा कॅन्टींग सुरू करावी, असा विचार मनात आला. भाऊ रवी यानेही होकार दिला. जवळ असलेल्या काही जमा रकमेतून भारतने सोशालिस्ट चौकात चहा कॅन्टींग सुरू केली आहे. त्याला भाऊ रवी व वडील देखील मदत करीत आहे. दररोज 700 रूपयांची मिळकत होत असून आता सर्वकाही व्यवस्थित असल्याचे भारत सांगतो. उच्चविद्याविभुषित असलेल्या भारतने सुरू केलेले कार्य बेरोजगार झालेल्या किंवा असलेल्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

दुधात मिसळत नाही पाणी
चहा बनविण्यासाठी भारत दररोज 23 लिटर दुध विकत घेतो. 23 लिटरच चहा बनवितो. त्यात पाणी मिसळत नाही. क्वॉलिटी व्यवस्थापक पदावर असलेला भारत अन्य पदार्थ देखील चांगल्या प्रतिचे वापरतो. त्यामुळे चहाची क्वॉलिटी उत्तम आहे. यामुळे भारत टी कॅन्टींगने शहरात अवघ्या काही महिन्यातच नावलौकीक केले आहे. चहा पिताच माईंड फ्रेश होऊन जाते.

युवकांनी हताश होऊ नये- भारत डोंगरे

भारत डोंगरे

बेरोजगारी ही आपली सगळयात मोठी समस्या आहे. यातच कोरोना काळात अनेकांना नोक-या गमावाव्या लागल्या आहे. परंतु, युवकांनी हताश होऊ नये. आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हावे. स्वयंरोजगार स्थापन करावा.
दुकाने व कार्यालयात पोहोचवितो चहा. बीएससी व एमबीए झालेला भारत कशाचीही तमा बाळगत नाही. ऑर्डर येत असलेल्या दुकानात व शासकीय, निमशासकीय कार्यालयात चहाचा थर्मास व डिस्पोजल ग्लास घेऊन जातो. गुडमॉर्निग व गुड ऑफ्टरनुन म्हणत जवळ येऊन चहा देतो. भारत कार्यालयात येताच सगळयांचे चेहरे प्रफुल्लित होऊन जाते.