The body of a youth was found in Ranwadi Shivara in Wardha district
मृतक कपिल भन्नारे

  • मृतक बालाघाटचा मूळ रहिवासी 

तळेगांव शामजीपंत (Talgaon Shyamjipant) : वर्धा जिल्ह्यातील तळेगांव नजीक असलेल्या राणवाडी शिवारात सोमवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला. याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कपिल हरिराम भन्नारे (२५) रा. वार्ड नं ५ माहेदुला बालाघाट मध्यप्रदेश असे मृत युवकाचे नाव आहे. तो कालच कामाच्या निमित्ताने तळेगांव येथे आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तळेगांव नजीक असलेल्या जिनिगमध्ये हा युवक कामासाठी आला होता. पोलिसांनी काही जणांना बयाण नोंदविण्यासाठी बोलावले असून मृतदेह शवविच्छेदनसाठी आर्वी येथे पाठविण्यात आला.