कोरोनामुळे प्राणी गणनेला दुसऱ्या वर्षीही खोडा; बुध्द पौर्णिमेला होणार नाही गणना

वैशाख अर्थात बुध्द पौर्णिमेला (Buddha Pournima) जंगलात जाऊन पाणवठयावर येणाऱ्या प्राण्यांची संख्या (the number of animals) मोजण्यात येते. यामुळे सदर जंगलात (the forest) कोणते व किती प्राणी आहे. याचा अंदाज बांधण्यात येतो. जिल्हयातील दोन वन परिक्षेत्रात (two forest ranges) ही गणना करण्यात येते.

  वर्धा (Wardha).  वैशाख अर्थात बुध्द पौर्णिमेला (Buddha Pournima) जंगलात जाऊन पाणवठयावर येणाऱ्या प्राण्यांची संख्या (the number of animals) मोजण्यात येते. यामुळे सदर जंगलात (the forest) कोणते व किती प्राणी आहे. याचा अंदाज बांधण्यात येतो. जिल्हयातील दोन वन परिक्षेत्रात (two forest ranges) ही गणना करण्यात येते. परंतु, कोरोना आजाराचे संक्रमण (the transmission of Corona disease) असल्याने सलग दुसऱ्या वर्षीही बुध्द पौर्णिमेला ही परंपरा खंडित होणार असल्यामुळे प्राणीप्रेमींची निराशा झाली आहे.

  बुध्द पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. त्यामुळे इतर पौर्णिमेपेक्षा या दिवशी प्रकाश अधिक असतो. यामुळे यादिवशी पशुगणना करण्यासाठी ट्रान्झटलाईन मेथड ही पध्दती अवलंबविण्यात येते. जंगलात वाघ, हत्ती व इतर प्राण्यांची संख्या किती. याचे मोजमाप करण्यासाठी पाणवठयावर येणाऱ्या प्राण्यांच्या आधारे गणना केली जाते. याकरिता पाणवठया शेजारी मचाण तयार करून वन्यजीव व प्राणीप्रेमींचे सहकार्य घेण्यात येते.

  जिल्ह्यातील प्रादेशिक वन परिसरात असलेल्या ढगा व खरांगणा जंगलात तसेच बोर व्याघ्र प्रकल्प व न्यू बोर परिसरात बुध्द पौर्णिमेच्या दिवशी प्राण्यांची गणना करण्यात येते. सामान्य माणसांना जंगलात एक रात्र काढण्याचा अनुभव यावा. जंगलाशी त्यांचे नाते जुळावे, याकरिता हा उपक्रम वन विभागाच्या वतीने राबविण्यात येतो. याकरिता जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठया शेजारी मचाण तयार करण्यात येते. यावर वनविभागाचा एक कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचा एक प्रतिनिधी मिळून रात्रभर पाणवठयावर येणाऱ्या प्राण्यांची गणना करतात. परंतु, कोरोना आजाराचे संकट असल्याने यावर्षीही प्राण्यांची गणना बुध्द पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणार नाही. यामुळे वन्यप्राणी प्रेमींच्या ईच्छेवर विरजण पडले आहे.

  २६ मे रोजी बुध्दपौर्णिमा
  गेल्यावर्षी 7 मे रोजी बुध्दपौर्णिमा होती. परंतु, मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊन करण्यात आल्याने प्राणी गणना करण्यात आली नाही. यावर्षी 26 मे रोजी (वैशाख) बुध्द पौर्णिमा आहे. परंतु, जिल्ह्यात कोरोना आजाराचे संकटामुळे संचारबंदी 31 मे पर्यत लागू करण्यात आली आहे. यामुळे प्राण्याची गणना करण्यात येणार नाही. यामुळे प्राणीप्रेमींमध्ये कमालीची निराशा पसरली आहे.

  ही पध्दत चुकीची
  वन्य प्राण्यांची अशापध्दतीने गणना करणे चुकीचे आहे. यादिवशी जंगलात अनेक जण गोळा होतात. यामुळे जंगलातील वातावरण विचलीत होते. गणना करण्यासाठी येणाऱ्यांना जेवण व पाणी देण्यासाठी वन विभागाच्या गाडया येतात. यामुळे प्राण्यांचे मार्गात अडसर निर्माण होतो. यामुळे वन्यप्राणी पाणवठयावर न येता पाणी न पिताच राहण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचे जीवास धोका होण्याचीही शक्यता असते.
  —- डॉ. किशोर वानखेडे, खगोल अभ्यासक, वर्धा

  वन विभागही करीत असतो नोंदी
  यावर्षी बुध्द पौर्णिमेला वन्यप्राण्यांची गणना करण्यात येणार नाही. ही केवळ औपचारिकता आहे. लोकांना जंगलाशी जोडणे हा उद्देश आहे. वन विभाग पाणवठयावर येणारे प्राणी, ट्रॅप कॅमरे, फोटो यांसह पाऊलखुणाचा आधार घेत वाघ, हत्ती व इतर प्राण्यांची गणना करीत असतात. या दिवशी प्राणी गणना करण्यात येणार नाही. तरी खरी आकडेवारी समोर येणार आहे. उलट जंगलात गर्दी होणार नसल्याने जंगल व वन्यप्राणी सुरक्षित राहणार आहे.
  — संजय इंगळे तिगावकर, मानद वन्यजीव रक्षक, वर्धा