वडीलाने मुलावर केले कु-हाडीचे वार

मद्यपी पित्याने मुलावर कु-हाडीने वार करीत त्याची निघृण हत्या केली. ही ह्दयद्रावक घटना आजनसरा शेत शिवारात शेत घडली. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी मुलाची हत्या करणा-या वडीलाला ताब्यात घेतले आहे.

    वर्धा (Wardha). मद्यपी पित्याने मुलावर कु-हाडीने वार करीत त्याची निघृण हत्या केली. ही ह्दयद्रावक घटना आजनसरा शेत शिवारात शेत घडली. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी मुलाची हत्या करणा-या वडीलाला ताब्यात घेतले आहे.

    माहिती अनुसार, आजनसरा येथील आरोपी अरुण काचोळे (56) यांना विनोद व प्रमोद असे दोन मुले होते. अरुणला दारुचे व्यसन होते. तो नेहमीच दारु पिऊन वाद घालीत होता. वडीलाच्या दारुच्या सवयीने त्रस्त झाल्याने प्रमोद काचोळे (30) दोन वर्षापासुन गावातच किरायाने घर घेऊन पत्नीसोबत राहत होते. प्रमोद मालवाहक, पानटपरी चालवुन शेतीकडे लक्ष देत होता. 13 फेब्रुवारीला रात्री दुपारी 4 वाजता मृतक प्रमोद नेहमीप्रमाणे शेतात काम करीत होता. त्याठिकाणी त्याचे वडील अरुण काचोळे दारुच्या नशेत तेथे गेले. त्याठिकाणी अरुणने प्रमोदला शिविगाळ केली. त्याने वडीलाला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु नशेमध्ये असलेल्या वडीलाने प्रमोदवर कु-हाडीने वार केले.त्याच्या डोक्यावर व मानेवर गंभीर वार केल्याने प्रमोद खाली कोसळला.

    जखमी मुलाच्या ओरडण्याची हाक ऐकू येताच शेजारील शेतकरी किसान चाफले घटनास्थळी पेाहचले.त्यांनी याबाबतची माहिती प्रमोदचा मोठा भाऊ विनोदला दिली. विनोदने गंभीर अवस्थेतील प्रमोदला वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले; परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान प्रमोदचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आजनसरा येथेखळबळ उडाली.पोलिसांनी रविवारी सकाळी आजनसरा येथून आरोपी वडीलाला ताब्यात घेतले.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, वडनेरचे ठाणेदार शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राजू सोनपितळे ,पोलिस कर्मचारी अजय वानखेडे, लक्ष्मण केंद्रे, प्रवीण बोधाने, विनोद राऊत करीत आहे.