सेलू शहरातून काढण्यात आलेली ‘‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’’ अभियानाची संदेश रॅली
सेलू शहरातून काढण्यात आलेली ‘‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’’ अभियानाची संदेश रॅली

सेलू (Selu).  महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने १० ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सेलू शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी रांगोळीच्या माध्यमातून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हा संदेश घरोघरी पोहचविण्यात आला.

तहसील कार्यालय सेलू येथून तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी हिरवी झेंडी दाखवत रॅलीची सुरुवात केली. कोरोना रुग्णांचा वाढता आलेख बघता तालुका प्रशासनतर्फे वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅली काढून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हा संदेश घरोघरी पोहचविण्यात आला. रॅलीची सुरुवात विकास चौकापासून करण्यात आली. सेलू शहराला वळसा देत रॅली घोराड गावात विकास चौक येथे समारोप करण्यात आला. आयोजनाकरिता महसूल विभाग, नगर पंचायत, पंचायत समिती, वीर भगतसिंग संस्था, आपले सरकार सेवा केंद्र व सायकल रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.