मंदिर चोरी प्रकरणातील आरोपी
मंदिर चोरी प्रकरणातील आरोपी

वर्धा (Wardha): स्वावलंबी शाळेजवळील संकट मोचन हनुमान मंदिर येथील दानपेटीचे कुलूप फोडून चिल्लर व नोटा असा एकूण 20 हजार रुपयांची रक्कम चोरणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

वर्धा (Wardha): स्वावलंबी शाळेजवळील संकट मोचन हनुमान मंदिर येथील दानपेटीचे कुलूप फोडून चिल्लर व नोटा असा एकूण 20 हजार रुपयांची रक्कम चोरणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

मंदिरातील चोरी प्रकरणी चंद्रशेखर राऊत यांनी रामनगर पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणी श्रावण खाकरे नामक आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. पोलिस तपास करीत असतांना पुलगाव येथील श्रावण खाकरे याने चोरी केली आहे. त्याचे पुलगाव येथील घरी शोध घेतला असता तो घटनेच्या दिवशीपासून शहरात नसल्याचे समोर आले होते; परंतु त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. आरोपीने स्वावलंबी शाळा परिसरातील संकट मोचन हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरून केल्याचे कबुल केले. आरोपीचे घर झडतीतुन चोरीचे रुपये हस्तगत करण्यात आले.

वर्धाकापूस खरेदी अनिश्चिततेच्या सावटात; खरेदीचा शुभारंभ दिवाळीनंतर होण्याची शक्यता

सदर आरोपीने गत 13 वर्षात अमरावती, नागपुर, चंद्रपुर वर्धा परिसरात अनेक मंदिरातील घंटा, देवावरील दागिने, दानपेटी मधील पैसे चोरी केले आहे. त्याचे विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याने तपासात उघड झाले आहे. आरोपीस अटक करून पुढील कारवाई करिता रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे प्रमुख नीलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे संतोष दरगुडे, गजानन लामसे, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, मनीष कांबळे, गोपाल बावनकर, प्रदीप वाघ, नवनाथ मुंडे यांनी केली.