प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

तलेगाव जवळील ममदापूर येथे एका कुडाच्या घराला दुपारच्यावेळी अचानक आग लागली. ही बाब तेथुन जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने जीवाची पर्वा न करता आग विझविण्यास मदत केली.

    तलेगाव (Talegaon).  जवळील ममदापूर येथे एका कुडाच्या घराला दुपारच्यावेळी अचानक आग लागली. ही बाब तेथुन जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने जीवाची पर्वा न करता आग विझविण्यास मदत केली. सामाजिक बांधिलकी जोपासत आगग्रस्ताला मदत केल्याने पोलिस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    ममदापूरच्या जवळील बसस्थानकाजवळ एक कुडाचे घर आहे. त्या रस्त्यावरुन जाणारे-येणारे उन्हाळयाच्या दिवसात काही काळ थांबून पाण्याची तहान भागवितात. पोलिस कर्मचारी अमोल इंगळे आपल्या कुटुंबीयासह दुचाकीने तलेगाव-आष्टी मार्गावरुन जात होते. दरम्यान त्यांना घराला आग लागल्याचे दिसुन आले. त्यांनी गाडी थांबवून कुटुंबियाला झाडाच्या सावलीत थांबावयास सांगून स्वत: आग विझविण्यास गेले. विशेष म्हणजे त्यांना तीन महिन्यांचा मुलगा आहे. परंतु त्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांनी घटनास्थळी जाऊन आगग्रस्ताची मदत केली. सुदैवाने अनुचित हानी टळली. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.