ग्रामीण भागात बोगस डॉक्टराचा सुळसुळाट; चुकीची औषधी देऊन रुग्णांची फसवणूक

कोरेानाच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी झालेली दिसते. याचाच फायदा घेत ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला दिसतो.

    समुद्रपूर (Samudrapur).  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी झालेली दिसते. याचाच फायदा घेत ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला दिसतो. या संदर्भात ग्रामसभा घेवून बोगस डॉक्टरांवर आळा घालण्याबाबत उपाय योजना कराव्यात, गावाच्या फलकावर बोगस वैद्यकीय व्यवसाय करणा-यांची यादी लावावी. जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल. कोरोना संक्रमणाचा फायदा घेत बोगस डॉक्टर सर्रासपणे आपल्या दवाखान्यात गर्दी करून रुग्णांचा उपचार करीत आहे.

    तसेच गावातील बोगस डॉक्टर रूग्णांच्या जीवाशी खेळ करीत आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रूग्णांवर औषधोपचार करीत आहेत. रुग्णांवर विविध प्रकाचे इंजेक्शन, सलाईनद्वारे उपचार करीत आहे. रूग्णांचे आजारही त्यांना लक्षात येत नाही, तरी औषधोपचार करतात. परिणामी निदान न झाल्याने रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कमी जास्त औषध देवून रूग्णांकडून लुबाडणूक करीत आहेत.बहुतांश डॉक्टरांकडे होमिओपॅथीची पदवी असतांनाही ते अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत आहेत.

    शासन निर्णयानुसार आता बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कमिटी आहे. फक्त तालुकास्तरीय समिती त्यास मदत करते. ग्राम समितीला देखील कारवाईचे अधिकार दिले आहेत. मात्र, तसे होत नाही. सध्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश नाहीत.सद्यस्थितीत कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गाव व परिसरात वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसलेले बोगस डॉक्टर रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी पध्दतीने उपचार करीत आहेत. ग्रामसभा घेवून अशा लोकांवर आळा घालण्याबाबत उपाय योजना कराव्यात, गावाच्या फलकावर बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादी लावावी. जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल, या डॉक्टरांच्या दवाखान्यात सध्या मोठी गर्दी दिसून येत आहे कोरूना काळात सोशल डिस्टंसिंग ची पालन न करता बिनधास्तपणे हे डॉक्टर उपचार करीत आहे सर्दी खोकला ताप पेशंटांना मेडिकल मधून औषध न देण्याचे निर्देश जरी असले तरी हे डॉक्टर बिनधास्तपणे रुग्णांना औषध देत आहे. डॉक्टरांचा सुळसुळाट गाव खेड्यांमध्ये झालेला आहे.

    या प्रकाराकडे जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार मागील अनेक वर्षापासून राजरोसपणे चाललेला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची मिळकत ही तुटपुंजी असल्यामुळे आणि उद्योग व्यवसायांचा अभाव असल्यामुळे पैशाची नेहमी चणचण भासते. या बाबीचा गैरफायदा हे बोगस डॉक्टर नेहमी घेत असतात. या डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारचे आरोग्यविषयक ज्ञान नसल्यामुळे बर्याचदा ग्रामीण भागात मध्ये जीवित हानी सुद्धा होण्याची दाट शक्यता असते. बोगस डॉक्टर हे स्थानिक त्याच गावाचे निवासी असल्याने ना हाक ना बोंब अशी परिस्थिती नेहमी उद्भवत असते. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची आणि जीविताशी खेळणा-या बोगस डॉक्टरांवर चाप बसवण्यासाठी जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाने धडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम आरोग्य विभाग नेहमी हाती घेते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. बोगस डॉक्टरांवर चाप बसवण्यासाठी जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाने धडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.