वर्धेतील चिखलाने माखलेले रस्ते अपघातास निमंत्रण देत आहेत.
वर्धेतील चिखलाने माखलेले रस्ते अपघातास निमंत्रण देत आहेत.

वर्धा (Wardha):  मल निस्सारणातील गटार योजनेने शहरातील मुख्य रस्ते चिखलमय झाले आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसाने कोणत्या रस्त्याने प्रवास करायचा? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. तेव्हा, वर्धेकरांनो बाहेर पडताय का? जरा दमानं घ्या.

मल निस्सारणाचे काम तीन वर्षापासून सुरू आहे. भाग एक मध्ये शहरातील काही मुख्य नगरामध्ये काम झाले. आता हे काम मुख्य बाजारातील रस्त्यावर सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध जेसीबीव्दारे नाल्या खोदल्या आहे. यातील निघालेला मलबा रस्त्याच्या दोन्ही बाजुला टाकला आहे. या नालीमध्ये अमृत योजनेचे पाईप टाकल्यानंतर त्याच मातीने बुजविल्या जात आहे. यातील काही मलबा रस्त्यावर पडलेला आहे. दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने हा मलबा पूर्ण ओलाचिंब झाला आहे. यामुळे शहरातील खोदलेले रस्ते चिखलमय झालेले आहे. या रस्त्यावर अनेक वाहने पडल्याने नागरिक जखमी झाले आहे. तेव्हा वर्धेकरांनो महत्वाच्या कामासाठीच घराच्या बाहेर पडा. नाही तर जखमी होण्यास तयार राहा, अशी अवस्था वर्धा नगर परिषदेव्दारा मलनिस्सारणाच्या गटार योजनेने केली आहे.

या योजनेच्या कामावर निरीक्षकाने “माझा काय संबंध” या उक्तीने सुरू असलेल्या कामावर आंधळेपणाची भूमिका घेतली आहे. वंजारी चौक ते इंगोले चौकापर्यतच्या रस्त्यावर पाऊस सुरू असतांना या गटार योजनेच्या कामाचे बांधकाम सुरू होते. काही नागरिकांनी कामाचा दर्जा पाहुन संबंधित कंत्राटदाराला काम बंद करण्यास बाध्य केले. त्यामुळे भविष्यात मलनिस्सारणाच्या गटार योजनेचे दररोज किती अध्याय पहायला मिळणार, यात तीळ मात्र शंका नाही.