काॅम्प्युटर साहित्य चोरीचा प्रतिकात्मक फोटो
काॅम्प्युटर साहित्य चोरीचा प्रतिकात्मक फोटो

हिंगणघाट (Hinganghat): वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड येथील लिटिल एंजेल्स हायस्कूल मधून संगणक, प्रिंटर आदी साहित्याची चोरी करण्यात आली. या साहित्याची किंमत 1 लाख 9 हजार रूपये आहे. ही घटना 14 ऑक्टोंबरला रात्रीचे दरम्यान घडली.

लिटील एंजेल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक अजय फुलझेले (40) यांचे तक्रारीवरुन अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्याध्यापक फुलझेले 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता मुख्याध्यापक शाळेत गेले असता कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले. त्यांनी लगेच संस्थेचे अध्यक्ष जयंत भोयर व कर्मचारी राजेंद्र सहारे यांना घटनेची माहिती देऊन शाळेत बोलाऊन घेतले. चोरटयानी दराचा कडी-कोंडा काढून दरवाजा उघडला आणि कार्यालयात प्रवेश साहित्य चोरी केले. पुन्हा कडी-कोंडा लावून चोरांनी पोबारा केला. चोरट्यांनी कार्यालयातील प्रोजेक्टर, ड्रोन कॅमेरा, संगणक, प्रिंटर, चार जीबी रॅम, हार्ड डिस्क, मॉनिटर, अडॉप्टर या साहित्यांची चोरी केली. या साहित्याची किंमत 1 लाख 9 हजार रूपये आहे. पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.