सिरसोली शेत, तालुका अंतोरा, जिल्हा वर्धा 
सिरसोली शेत, तालुका अंतोरा, जिल्हा वर्धा 

नजीकच्या सिरसोली येथील 21 शेतक-यांच्या शेतातील विहिरीवर लावण्यात आलेले मोटरपंप चोरी करण्यात आले होते. ही घटना 23 ऑगस्ट रोजी वर्धा जिल्ह्यातील अंतोरा गाव परिसरात घडली. शेतकऱ्याकडे आता मोटरपंप नसल्याने शेतातील विहिरीत पाणी असूनही ते पिकांना देणे शक्य होत नाही. यामुळे पिके वाळत असून शेतक-यांची चिंता वाढली आहे. पोलिसांनी जातीने लक्ष देऊन चोरटयांचा शोध घेत मोटारी जप्त करण्याची मागणी होत आहे.

  • मोटरपंप चोरटे अद्यापही पसारच

अंतोरा (Antora) : नजीकच्या सिरसोली येथील 21 शेतक-यांच्या शेतातील विहिरीवर लावण्यात आलेले मोटरपंप चोरी करण्यात आले होते. ही घटना 23 ऑगस्ट रोजी वर्धा जिल्ह्यातील अंतोरा गाव परिसरात घडली. शेतकऱ्याकडे आता मोटरपंप नसल्याने शेतातील विहिरीत पाणी असूनही ते पिकांना देणे शक्य होत नाही. यामुळे पिके वाळत असून शेतक-यांची चिंता वाढली आहे. पोलिसांनी जातीने लक्ष देऊन चोरटयांचा शोध घेत मोटारी जप्त करण्याची मागणी होत आहे.

शेतातून मोटारी चोरी गेल्या त्यावेळी पावसाळा असल्याने शेतातील मोटर पंप बंद होते. त्यामुळे सर्व शेतक-यांचे रात्री गस्त घालणे सुद्धा बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी सिरसोली येथील २१ शेतक-यांच्या शेतातील मोटरपंपाच्या थ्री फेज इलेक्ट्रॉनिक मोटरपंप व त्यातील तांब्याचे तार चोरी केले होते. या प्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात मनीष पाथरे, प्रमोद शहाणे, मनोहर कावळे यानी तक्रार दाखल केली होती. यावेळी तळेगाव ठाणेदार रवी राठोड व चमूने पंचनामा केला. अज्ञात आरोपीचे विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. परंतु, अद्यापही चोरट्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. यामुळे शेतक-यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

चणा पिकाकरिता शेतीचे मशागत करावी लागते. याकरिता जमिनिला ओलावा असणे आवश्यक असून यासाठी मोटरपंपाच्या माध्यमातून पाण्याची आवश्यकता आहे. याकरिता मोटर पंप असणे महत्त्वाचे आहे. परंतु पोलिसांनी आतापर्यत मोटरपंप चोरटयांचा शोध घेतला नाही. पोलिसांनी तत्काळ तपास करून चोरट्याचा शोध घेत न्याय मिळून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.