पुलगाव येथील साहित्य चोरीतील आरोपी
पुलगाव येथील साहित्य चोरीतील आरोपी

येथील चंद्रशेखर आझाद हिंदी प्राथमिक शाळेतील किचनमधुन साहित्य चोरी केल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई 14 डिसेंबर रोजी करण्यात आली. कुलदीप रामदास चंदनव (29) रा. आर्वी नाका चौक पुलगाव, प्रकाश तिवसकर (56) रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी पुलगाव तसेच चोरीचा माल विकत घेणारे विकास उईके (24) रा. ठाकूर मोहल्ला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांचेकडून चोरी करण्यात आलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पुलगाव (Pulgaon). येथील चंद्रशेखर आझाद हिंदी प्राथमिक शाळेतील किचनमधुन साहित्य चोरी केल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई 14 डिसेंबर रोजी करण्यात आली. कुलदीप रामदास चंदनव (29) रा. आर्वी नाका चौक पुलगाव, प्रकाश तिवसकर (56) रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी पुलगाव तसेच चोरीचा माल विकत घेणारे विकास उईके (24) रा. ठाकूर मोहल्ला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांचेकडून चोरी करण्यात आलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पुलगाव येथील चंद्रशेखर आझाद हिंदी प्राथमिक शाळा दिवाळीचे सणामुळे 13 ते 19 नोव्हेंबर दरम्यान बंद होत्या. त्यामुळे शाळेतील संपूर्ण स्टॉफ सुट्टीवर होता. शाळेत खिचडी बनविण्यासाठी एक किचन तयार करण्यात आले आहे. अन्न शिजविण्यासाठी वापरण्यात येणा-या साहित्यापैकी 1 हजार रूपये किमतीचे सिलेंडर, 5 हजार रूपये किमतीची अर्धा हॉर्स पॉव्हरची पाण्याची मोटर, 1 हजार रूपये किमतीचा गंज असा एकूण सात हजार रूपये किमतीचे साहित्य चोरी करण्यात आले होते. याप्रकरणी मुख्याध्यापिका प्रिती मुलचंद गौर (38) यांनी पुलगाव पोलिसांत तक्रार केली होती. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीचे विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिस चोरटयांचा शोध घेत असतांना पुलगाव येथील कुलदीप चंदनव व प्रकाश तिवसकर यांनी हा ऐवज चोरल्याचे समोर आले.

त्याचेकडून मोटरपंप व गंज जप्त करण्यात आला. चोरीचे सिलेंडर विकास उईके याने विकत घेतल्याने त्यासंह तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन चोरटयांनी शाळेसह याच परिसरातील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव, ठाणेदार रवींद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल कोल्हे यांचे मार्गदर्शनात राजेंद्र हाडके, संजय पटले, पंकज टाकोणे, शरद सानप यांनी केली.