वर्धा जिल्ह्यातील पोरगव्हाण परिसरात वीज कोसळल्याने जखमी झालेले शेतकरी रुग्णालयात उपचार घेताना
वर्धा जिल्ह्यातील पोरगव्हाण परिसरात वीज कोसळल्याने जखमी झालेले शेतकरी रुग्णालयात उपचार घेताना

आष्टी शहीद (Aashti Shahid) :  वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद तालुक्यात अवकाळी पावसाने शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. यातच पोरगव्हाण परिसरातील शेतात वीज पडल्याने तीन मुले जखमी झाले आहे.
तालुक्याच्या पोरगव्हाण परिसरात ९ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. येथील प्रवीण केचे यांच्या शेतात वीज पडली.

शेतकरी सिद्धार्थ जोगे यांच्या शेतात खात टाकणारे गजानन नेहारे (१४), आरती राऊत (१६), बंडू मनोहरे (२५) पाऊस सुरू झाल्याने घरी परत येत असताना अचानक बाजूच्या शेतात लिंबाच्या झाडावर पुन्हा वीज पडली. यात हे तिघेही जण किरकोळ जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झाली नाही.

घटनेची माहिती पोरगव्हाण गावात वा-यासारखी पसरली. जखमींना त्वरित ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचाराकरिता आणण्यात आले. त्यांच्यावर येथील डॉक्टरनी प्राथमिक उपचार करून त्यांना अमरावती येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.