प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गंभीर गुन्हयात सहभागी असलेल्या तीन आरोपींना उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेशानुसार तडीपार करण्यात आले. त्यांची पाहणी केली असता ते घरी आढळून आले. यामुळे त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

वर्धा (Wardha). गंभीर गुन्हयात सहभागी असलेल्या तीन आरोपींना उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेशानुसार तडीपार करण्यात आले. त्यांची पाहणी केली असता ते घरी आढळून आले. यामुळे त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

उपविभागीय दंडाधिकारी यांचे 24 फेब्रुवारी 2020 रोजीचे आदेशानुसार राजेंद्रसिंग लखनसिंग जुनी (27) वर्षे, रा. हनुमान गढ, कारला चौक, वर्धा, तेजसिंग किसनसिंग यादव (34) रा. गिट्टीखदान झोपडपट्टी, बोरगाव मेघे, वर्धा व संतोष पुंडलिकराव धोंगडे (33) रा. येळाकेळी यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. त्यांची तपासणी केली असता ते त्यांचे राहते घरी मिळून आलेत. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिन्ही तडीपार आरोपी कोणतीही वैध सबब किंवा रितसर कारण नसतांना त्यांनी मनाई क्षेत्रात अनधिकृतरित्या प्रवेश केला. यामुळे त्यांचे विरुद्ध रामनगर व सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात अशोक साबळे, निरंजन वरभे, हमीद शेख, रणजीत काकडे, अनिल कांबळे,अविनाश बंसोड, नितीन सहारे, अमोल ढोबळे यांनी केली.