Wardha-Accident

रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे गणपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथे राष्ट्रीय महामार्गावर(accident on wardha national highway) सोमवारी रात्री हा अपघात झाला.

वर्धा: रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे गणपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथे राष्ट्रीय महामार्गावर(accident on wardha national highway) सोमवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलाजवळ रात्री साडे अकरा वाजता हा अपघात घडला असल्याचे समजते. गणपतीपुळ्याला निघालेले ते तरुण नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातल्या हिवरा गावचे होते. रात्री पुलाजवळ येत असताना त्यांची बोलेरो गाडी जवळ उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.  त्यानंतर कारचा चेंदामेंदा झाला.

अपघातात वाहनचालक शैलेश गिरसावले, आदर्श कोल्हे , सूरज पाल यांचा मृत्यू झाला आहे.  यश कोल्हे, भूषण खोंड, शुभम पाल, प्रणय कोल्हे, समीर कोल्हे, मोहन मुंढे यांची प्रकृती गंभीर आहे. या ५ जणांवर  सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.