माणिकवाडा शिवारात वाघाची दहशत; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

आष्टी (शहीद) परिसरातील माणिकवाडा येथील कोल्हाकाळी शिवारात वाघाचा सतत वावर आहे. रात्रपाळीत वीज असलेल्या दिवशी शेतकऱ्यांना ओलित करावे लागते. परिसरात रोही, जंगली श्वापदे व इतर वन्यप्राणी राहतात. यामुळे वाघ शिकारीसाठी परिसरात येतो.

    आष्टी (शहीद) Ashti (Shahid).  माणिकवाडा येथील कोल्हाकाळी शिवारात वाघाचा सतत वावर आहे. रात्रपाळीत वीज असलेल्या दिवशी शेतकऱ्यांना ओलित करावे लागते. परिसरात रोही, जंगली श्वापदे व इतर वन्यप्राणी राहतात. यामुळे वाघ शिकारीसाठी परिसरात येतो. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

    परिसरातील शेतकरी मोहन पंजाबराव मानमोडे हे दोन दिवसांपूर्वी रात्री शेतात ओलित करीत होते. याच दरम्यानसोबत असलेल्या चार श्वानांपैकी एका मोठ्या शवाची त्यांच्या नजरेसमोर वाघाने शिकार केली. सोबत श्वान असल्याने मोहन मानमोडे यांच्यावर वाघाने हल्ला केला नाही; परंतु नजरेसमोर त्यांचे श्वानाला जीव गमावावा लागला. अन्यथा मोहन मानमोडे यांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला असता. वन्य प्राण्यांच्या दहशतीत शेतकऱ्यांना रात्रपाळीत ओलित करावे लागत असून जीव धोक्यात टाकावा लागतो. वन्य विभागाने या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.