उभ्या ट्रकला दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

कारंजा (घाडगे) (Karanja Ghadge):  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून भरधाव वेगाने येणा-या ट्रकने धडक दिली. यामध्ये ट्रकचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी 5.30 वाजता नॅशनल हायवे क्रमांक -6 वर नागलवाडी शिवारात घडला.

ट्रक क्रमांक MH40 ,बीएल- 5837 हा रस्त्यावर उभा होता व एम एच – जेयू 0529 हा ट्रक नागपूरवरून अमरावतीकडे जात असताना त्याने उभ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात मिर्झापूर जिल्ह्यातील रामपूर येथील ट्रक चालक सुनील पाल वय (25) व गुप्तनाथ दीनदयाल पाल वय (25) वर्षे हे दोघे जखमी झाले. दोघांनाही कारंजा येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले; परंतु उपचार दरम्यान ट्रकचालक सुनील पाल (25) याचा मृत्यू झाला. हा ट्रक नागपूरवरुन पुण्याला जात होता. पहाटे धुके असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेला उभा ट्रक दिसून न आल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी उभ्या ट्रकचा चालक देवळी अविनाश कोकाटे वय (25 ) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास कारंजा पेालिस करीत आहे.