कोरोना नियंत्रणासाठी जनतेला विश्वासात घ्या; खासदार तडस यांच्या सूचना

जिल्ह्यात कोरोना आजाराचे रूग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन विविध उपाय करण्यात येत आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने जनतेला विश्वासात घ्यावे, अशी सूचना खासदार रामदास तडस यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना केली. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची भेट घेत लोकसभा क्षेत्राच्या निगडीत अनेक विषयावर चर्चा केली. सोबतच जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

    वर्धा (Wardha).  जिल्ह्यात कोरोना आजाराचे रूग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन विविध उपाय करण्यात येत आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने जनतेला विश्वासात घ्यावे, अशी सूचना खासदार रामदास तडस यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना केली. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची भेट घेत लोकसभा क्षेत्राच्या निगडीत अनेक विषयावर चर्चा केली. सोबतच जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

    वर्धा जिल्हयातील देवळी, पुलगांव, आर्वी व सिंदी (रेल्वे) व्दारा घनकचरा व्यवस्थापन नियोजनाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु, सदर प्रस्तावाला अद्यापंर्यत मान्यता न मिळाल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाची कामे प्रलंबित आहे. पुलगांव नगर परिषद अंतर्गत दलित वस्तीचे कामांना मंजुरी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत. त्याचे कामसुध्दा पूर्ण होत आहे. परंतु, त्यांना अनुदानाचा दुसरा व तिसरा हफ्ता प्राप्त न झाल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक घरकुलाची कामे प्रलंबित आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे निधी मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री यांना भेटून हा विषय उपस्थित केला होता. त्यांच्या उत्तरानुसार राज्यसरकारने निधीचे उपयोगीता प्रमाणपत्र केंद्राकडे सादर न केल्यामुळे निधी प्रलंबित आहे. याकरिता राज्यसरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा.

    प्रधानमंत्री आवास योजना सर्वासाठी घरे 2022, रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे. अनेक लाभार्थ्यांना शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्यात आलेले आहे. परंतु, अद्यापपर्यंत सर्व लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे मंजूर असलेले घरकुलाचे काम प्रलंबित आहे. त्यांना जमीनीचे वाटप त्वरीत करावे. केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प, रेल्वे उड्डाणपुल तसेच महामार्गाचे कार्य प्रगतीपथावर आहे. परंतु, वनविभाग व भूमी अधिग्रहण विलंबामुळे प्रकल्प प्रलंबित आहे. यावर त्वरीत निर्णय घेण्यात यावा. उन्हयाळयापूर्वी जिल्हयातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनेचा आढावा. यांसह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली.

    माहितीनुसार 22 फेब्रुवारी पर्यत जिल्हयात कोरोना बाधिंतांची संख्या 11 हजार 367 आहे. कोरानामुक्त झालेले 10 हजार 335 आहे. 332 रुग्णांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. 700 रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. वर्धा जिल्हयातील कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता कोविड चाचण्याचे प्रमाण वाढविणे तसेच रुग्णांना दर्जात्मक उपचार व योग्य मार्गदर्शन देण्याकरिता प्रशासनाने सहकार्य करावे, अशी सूचना खासदार रामदास तडस यांनी यावेळी केल्या. जिल्हयातील जनता प्रशासनाच्या आवाहनाला नेहमीच सकारात्मक सहकार्य करीत असते. प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतांना जनतेला व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कार्य करावे, अशी अपेक्षा खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केली.