प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे समाज नेहमी बदनाम झाल्याच्या घटना अनेकदा आपण पहिल्या. अशीच घटना देवळी शहरालगत झोपडपट्टीमध्ये घडली आहे.

    देवळी (Deoli).  विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे समाज नेहमी बदनाम झाल्याच्या घटना अनेकदा आपण पहिल्या. अशीच घटना देवळी शहरालगत झोपडपट्टीमध्ये घडली आहे. पैशासाठी लोक कोणत्या थराला जातील, याचा नेम राहिला नाही. येथील पित्याने पोटच्या मुलीला विक्री करण्यासाठी पळवून नेल्याची तक्रार त्याच्या पत्नीने देवळी पोलिस ठाण्यात दिली आहे.

    देवळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळी तहसील परिसरात भटक्या समाजाचे लोक राहतात. येथील फिर्यादी दुर्गा कैलास मोहिते (वय 40) यांची अल्पवयीन मुलगी उषा (वय 8) ही झोपडीसमोर खेळत असताना तिचे वडील कैलास मोहिते याने आपल्या मुलीला बाहेरगावी घेऊन तिची विक्री करण्याच्या उद्देशाने पळवून नेले, असा दाट संशय आहे.

    फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेच्या वेळेपासून आरोपी कैलास मोहिते आणि अल्पवयीन मुलगी उषा हे दोघेही बेपत्ता आहेत. आरोपी पित्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर आरोपीचा शोध देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलिस करीत आहे.