शासकीय शहीद स्मारक, जिल्हा वर्धा
शासकीय शहीद स्मारक, जिल्हा वर्धा

साहूर (Sahur) : 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणा-या शहिदांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी राज्यभरात शासकीय शहीद स्मारकाची निर्मिती केली. यामध्ये आष्टी तालुक्यात पाच स्मारक बांधकाम करण्यात आले. स्मारक तयार झाल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सतत दुर्लक्ष झाले. मात्र मागील वर्षी राज्य शासनाने शहीद स्मारकासाठी निधी मंजूर केल्यामुळे स्मारकाचा चेहरामोहरा पालटला. शहीद स्मारकाचे रूपडे पालटल्याने गावक-यांनी समाधान व्यक्त केले.

वडाळा येथील शहीद स्मारकात टिनपत्रे बदलविण्यात आली. अंतर्गत पीयुपी करण्यात आली. लाईनची फिटिंग करण्यात आली. भिंतीला पुटींग करण्यात आले. रंगरंगोटीचे काम करण्यात आले. कोटा बसविण्यात आला. संडास व बाथरूमचे नूतनीकरण झाले. सुसज्ज किचन करण्यात आली. आवारामध्ये मोकाट जनावरांचा संचार होऊ नये. शासकीय जागा शाबूत राहावी म्हणून लोखंडी अँगल व लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले. मुख्य मुख्य प्रवेशद्वारावर मोठे व लहान गेट बसविण्यात आले. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य लावण्यात आले. त्या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून पेविंग ब्लॉक लावण्यात आले. आबालवृद्धांना बसण्यासाठी झाडाच्या सभोवताल विटासिमेंटचे ओठे तयार करण्यात आले. शहिदांच्या स्मृतीचे स्तंभ म्हणून उभारण्यात आलेला भलामोठा उंच स्तंभ रंगरंगोटीमुळे देखणा व सुसज्ज झालेला आहे. झेंड्याच्या सभोवताल ग्रॅनाईट बसविण्यात आले. या सर्व कामामुळे शहीदस्मारकामध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हे काम पूर्ण केले आहे. कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, उपविभागीय अभियंता ए.आर. बारब्दे, शाखा अभियंता विवेक खरबडे यांच्या चमूने नुकतीच पाहणी केली आणि चांगल्या दर्जाचे बांधकाम पाहून समाधान व्यक्त केले.

शहिदांचा वारसा जपण्यासाठी शासनासोबत गावक-यांनीही सहकार्य करण्याची भूमिका कायम ठेवावी, असे मत कार्यकारी अभियंता कुंभे यांनी व्यक्त केले. वडाळा येथील उपसरपंच बबन कोहळे यांनी बांधकामाच्यावेळी शासनाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. त्यामुळे त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. लोकप्रतिनिधी सक्रिय असल्यास गावाच्या विकासाला त्याची नेहमीच मदत होते. हे वडाळा येथील बांधकामावरून पाहायला मिळाले. शासनाकडे सतत पाठपुरावा करणे ते काम मंजूर करून घेणे व मार्गी लावणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे वडाळा येथील शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण व बांधकाम पाहून गावक-यांनी समाधान व्यक्त केले. या बांधकामाची जोपासणी ग्रामपंचायत प्रशासनाने कायम ठेवावी, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

ग्रामस्थांची मागणी झाली पूर्ण
वडाळा येथील शहीद स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. शहीदांच्या स्मृती कायम जतन करण्यासाठी शासन प्रयत्न करत असतात. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व काम व्यवस्थित झाले आहे. या कामासाठी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची प्रतीक्षा होती ती पूर्ण झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
— सुनील कुंभे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग वर्धा.