Two arrested for spreading terror with weapon in Wardha
चाकूचा प्रतीकात्मक फोटो

वर्धा. (Wardha ).  चाकुचा धाक दाखवुन दहशत पसरविणा-या दोन युवकांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. यात इतवारा येथील शुभम दशरथ खत्री (२२) व नागेश जानराव फुलझले (१९) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. त्यांचेकडून चाकू जप्त करण्यात आला आहे.

माहितीनुसार नागेश हा जुन्या जिल्हा परिषद इमारती जवळ चाकू दाखवुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. याची माहिती पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांना मिळताच त्यांची घटनास्थळ गाठुन नागेशला अटक केली. त्याचेकडून चाकू जप्त करण्यात आला. शुभम हा रेल्वेस्थानक परिसरात दहशत पसरवित होता. त्यालाही पोलिसांनी अटक करीत चाकू जप्त केला. दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.