दुचाकी चोरट्यास सहा तासात अटक; आर्वी पोलिसांची कारवाई

दुचाकी चोरी प्रकरणी आरोपीस आर्वी पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. ही घटना 14 डिसेंबर डिसेंबर रोजी घडली. गजानन उत्तम वलके (45) रा. धनोडी (बहाद्दरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वर्धा (Wardha).  दुचाकी चोरी प्रकरणी आरोपीस आर्वी पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. ही घटना 14 डिसेंबर डिसेंबर रोजी घडली. गजानन उत्तम वलके (45) रा. धनोडी (बहाद्दरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव (धांदे) येथील बाबाराव किसन दडांगे (64) यांचा विटभट्टीचा व्यवसाय आहे. यावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. विटांचे पैसे घेण्यासाठी ते निंबोली शेंडे येथे ईरपाचे यांच्या घरी एमएच 27 बीआर 1436 क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. गाडी घराबाहेर उभी करून ते आतमध्ये गेले होते. यावेळी चाबी गाडीलाच लावुन होती. यानंतर बाबाराव दडांगे परत आले असता दुचाकी आढळून आली नाही. आजुबाजुचे लोकांना विचारपूस करण्यात आली. परंतु, दुचाकी आढळून आली नाही. यामुळे आर्वी पोलिसांत तक्रार करण्यात आली. याप्रकरणाचा तपास करीत असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धनोडी येथील गजानन वलके यांस ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याचेकडू दुचाकी जप्त करीत त्यास अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात भगवान बावणे रणजीत जाधव, भुषण निघोट, चंदशेखर वाढवे, अनिल वैद्य, राजू राऊत, अतुल भोयर, मनोज भोमले, प्रदीप दातारकर, सतीश नंदागवळी यांनी केली.