प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नागपूर-चंद्रपूर मार्गावर (Nagpur to Chandrapur) जाम जवळ (near Jam) नागपूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील अज्ञात वाहनाला जबर धडक बसली. (lost control and hit an unidentified vehicle in front) या अपघातात ट्रक चालकाचा स्टेअरींगमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    समुद्रपूर (Samudrapur). नागपूर-चंद्रपूर मार्गावर (Nagpur to Chandrapur) जाम जवळ (near Jam) नागपूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील अज्ञात वाहनाला जबर धडक बसली. (lost control and hit an unidentified vehicle in front) या अपघातात ट्रक चालकाचा स्टेअरींगमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (The truck driver got stuck in the steering wheel and died on the spot)

    मिळालेल्या माहितीनुसार रविवार २३ मे रोजी रात्री १.२० दरम्यान आयशर क्रमांक एम. एच. ४९ ए.टी. ३३८५ चा चालक प्रदीप सरोदे, (३८) , रा.नागपूर हा पेदापल्ली वरून आंबा घेवून नागपूरला गेला व गाडी खाली करून पुन्हा आंबे भरण्याकरीता पेदापल्ली तेलंगना येथे जात होता. मात्र, गाडी चालवताना झोप आल्याने सरोदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांच्या गाडीची एका अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. या अपघातात सरोदे स्टेअरींगमध्ये अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    यावेळी ट्रकमध्ये असलेले राहुल सुधाकर ( ४८), गौतम शंकर नका ( २१) रा. दोन्ही पेदापल्ली (तेलंगना) व्दारका बेनीप्रसाद गौर ( ४८) रा. नागपुर हे जखमी झाले. अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकीला मिळताच साय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल राऊत, पोलीस कर्मचारी नरेद्र दिघडे, नागेश तिवारी, बंडू डडमल, दिलीप वादीले, यांनी घटनास्थळी जाऊन आयशरमधील फसलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी समुद्रपूरला रवाना केला.

    तसेच जखमींनाही बाहेर काढून समुद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर रोडवर अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यासंदर्भात समुद्रपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.