व्हॅक्युम क्लिनर मशीन
व्हॅक्युम क्लिनर मशीन

वर्धा (Wardha):  स्वच्छ भारत अभियान सगळीकडे राबविण्यात येत आहे. वर्धा नगर पालिकेचाही यात सहभाग आहे. परंतु, नगर पालिकेत शहरातील सुखा कचरा उचलण्यासाठी अडीच वर्षापूर्वी व्हॅक्युम क्लिनर मशीन घेण्यात आली. परंतु, 11 लाख रूपये किमतीची ही मशीन पालिकेच्या कार्यालयात धुळ खात असल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

वर्धा (Wardha):  स्वच्छ भारत अभियान सगळीकडे राबविण्यात येत आहे. वर्धा नगर पालिकेचाही यात सहभाग आहे. परंतु, नगर पालिकेत शहरातील सुखा कचरा उचलण्यासाठी अडीच वर्षापूर्वी व्हॅक्युम क्लिनर मशीन घेण्यात आली. परंतु, 11 लाख रूपये किमतीची ही मशीन पालिकेच्या कार्यालयात धूळ खात असल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. यात वर्धा नगर पालिकेचा देखील सभाग आहे. हातगाडयांच्या सहायाने संपूर्ण शहरातील कचरा उचलण्यासाठी 11 लाख रूपये खर्च करून जीएम पोर्टलवरून व्हॅकुम क्लिनर मशीन वर्ष 2018 मध्ये विकत घेण्यात आली. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत निधी देण्यात आला.ही मशीन बॅटरीवर चालत असून फुल चॉर्ज केल्यानंतर चार तास ही मशीत सतत सुरू राहु शकते. या मशीनच्या सहायाने केवळ सुखा कचरा उचण्यात येतो. सुरुवातीचे दिवसाला काही दिवस या मशीनचा उपयोग करण्यात आला. परंतु, यानंतर ही मशीन बंद अवस्थेत पालिका कार्यालयात धुळ खात आहे. यामुळे 11 लाख रूपये खर्च करून विकत घेतलेली मशीन धुळखात असल्याने पालिकेच्या वतीने जनतेच्या पैशाचा दुरूपयोग करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मुख्याधिकारी म्हणतात डेमो दाखवा
पालिकेत मुख्याधिकारी म्हणून विपीन पालिवाल यांनी नुकताच पदभार सांभाळला आहे. त्यांनी विभागाचे कर्मचा-यांना मशीनचा डेमो दाखविण्याची सूचना केली आहे. कोरोनामुळे शहरातील उद्याने बंद आहे. उद्यानात फिरायला आलेले नागरिक या ठिकाणी कचरा तसाच टाकून जातात. शहरातील उद्याने सुरू झाल्यानंतर या मशीनचा उपयोग उद्यानातील सुखा कचरा उचलण्यासाठी करण्यात येणार आहे.
त्याच ठिकाणी उपयोग केल्या जाणार आहे.

पुन्हा घेण्यात येईल दोन मशीन
शहरात सगळीकडे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. काही भागात कामे पूर्ण झाली आहेत. तर, काही ठिकाणी कामे पूर्णत्वास जाण्याचे मार्गावर आहे. या सिमेंट रस्त्यावर धुळ व कचरा मोठया प्रमाणात साचून राहतो. अवजडवाहनांमुळे धुळ उडत असल्याने याचा त्रास दुचाकी चालकांना व इतर नागरिकांना होत आहे. यामुळे रस्त्यावरील धुळ व इतर कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या वतीने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून दोन मशील घेतल्या जाणार आहे. असा प्रस्ताव पालिकेच्या वतीने पाठविण्यात येणार आहे.