हिंगणघाटमध्ये अभिजित वंजारी यांचा विजयोत्सव; ढोल- ताशे वाजवून फोडले फटाके

महाविकास आघाडीचे नागपूर पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अँड. अभिजीत वंजारी यांच्या विजयाचा जल्लोष शहरातील मोहता चौकात अँड. सुधीर कोठारी यांचे घरासमोर फटाके फोडून व ढोलताशांच्या गजरात साजरा करण्यात आला.

हिंगणघाट (Hinganghat). महाविकास आघाडीचे नागपूर पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अँड. अभिजीत वंजारी यांच्या विजयाचा जल्लोष शहरातील मोहता चौकात अँड. सुधीर कोठारी यांचे घरासमोर फटाके फोडून व ढोलताशांच्या गजरात साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाची ५० वर्षांची मक्तेदारी मोडून काढत महाविकास आघाडीच्या झंझावाताने भारतीय जनता पक्षाचा बुरुज ढासळण्यात आला. पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजीत कांबळे, माजी मंत्री अशोक शिंदे, अनिल जवादे यांच्या अमुल्य मार्गदर्शनामुळे व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे व नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे हा महाविजय साजरा करु शकल्याचे मत अँड. सुधीर कोठारी यांनी यावेळी व्यक्त केले. हिंगणघाट शहरातील सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांसह जेष्ठ नेते अँड. सुधीर कोठारी, समुद्रपूर बाजार समितीचे हिंमत चतुर, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, सुरेश मुंजेवार, प्रवीण उपासे, आफताब, नगरसेवक राजू खुपसरे, नीलेश ठोंबरे, धनंजय बकाने, बाळु अनासने , सुरज ढोमणे, प्रकाश राऊत, श्रीकृष्ण मेश्राम, राजेश धनरेल, विनोद झाडे, शंकर मोहमारे, पंकज कोचर, ज्वलंत मुन, मुन्ना त्रिवेदी, विठ्ठल गुळघाणे, संजय चव्हाण, पप्पु मोहता, अमित चाफले, सूर्यकांत तिजारे, शेरा, गणेश वैरागडे, नकुल भाईमारे, पंकज पाके, देवपल्लीवार, राजू वैरागडे, इनायत यासह असंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.