विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते जपताहेत सामाजिक दायित्व; कोविड रुग्णांवरील अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत सेवा

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीवर (the person who died due to corona) अंत्यसंस्कार करण्यासाठी (the crematorium to bury the person) काही कुटुंबासह नातेवाईकही स्मशानघाटाकडे फिरकत नसल्याचे आपण पाहत आहोत. तर दुसरीकडे रक्ताचे नाते नसतानाही केवळ समाजासाठी आपलं काही देणं लागते, या भावनेतून वर्धा येथील दहा युवकांनी सामाजिक दायित्वाचा (social responsibility) वसा हाती घेतला आहे.

  वर्धा (Wardha).  कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीवर (the person who died due to corona) अंत्यसंस्कार करण्यासाठी (the crematorium to bury the person) काही कुटुंबासह नातेवाईकही स्मशानघाटाकडे फिरकत नसल्याचे आपण पाहत आहोत. तर दुसरीकडे रक्ताचे नाते नसतानाही केवळ समाजासाठी आपलं काही देणं लागते, या भावनेतून वर्धा येथील दहा युवकांनी सामाजिक दायित्वाचा (social responsibility) वसा हाती घेतला आहे. कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील हिंदू स्मशानभूमीत अहोरात्र सेवा देत आहेत.

  वर्धा नगरपालिकेने आजपर्यंत कोविडने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेला मृत्यूचा आकडा पाहता दिवसाकाठी एक लाख रुपयांचा खर्च प्रशासनाला उचलणे शक्य नसल्याचे म्हणत जबाबदारी झटकली आहे.

  जिल्ह्यात मागील आठवड्यापर्यंत दिवसाकाठी सरासरी 40 प्रेतावर अंत्यसंस्कार करावे लागत होते. एका अंत्यसंस्काराठी किमान 2500 रुपयांप्रमाणे दिवसभरात एक लाखाचा खर्च येत होता. यापुढे नगरपालिकेला खर्च झेपणार नसल्याचे म्हणत विश्व हिंदू परिषदेअंतर्गत वसूधा वुडलेस क्रिएशन या एनजीओला अंत्यसंस्कारासाठी पैसे देणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अंत्यसंस्कार केल्यानंतर संबंधिताच्या नातेवाईकांकडून लागणारा खर्च घेतला जातो. बेवारस म्रत्तदेहावर मोफत अंत्यसंस्कार करण्याचे काम विश्वहिंदू परिषदेकडून करण्यात येत आहे.

  दरदिवशी चार प्रेतावर मोफत अंत्यसंस्कार (Free cremation on four corpses per day)
  मागील आठवड्यापूर्वी दरदिवशी सरासरी 40 प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. तर सध्या 12 ते 15 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यापैकी तीन ते चार प्रेताचे कोणीही नातेवाईक येत नसल्याने हिंदू विश्व परिषदेमार्फत स्वःखर्चाने अंत्यसंस्कार केले जातात.

  स्मशानभूमीत १४ तास सेवा (14 hours service at the cemetery)
  येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एकूण 16 व्यक्ती कार्यरत आहेत. त्यात सहा जण पगारावर असून उर्वरित 10 जण केवळ समाजाचं काहीतरी देणं आहे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिप्फवाईज आळीपाळीने सकाळी 6 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत सेवा देत आहेत. त्यात संजय बडगेलवार, रोशन पटेल, राजेंद्र राजपुरोहित, नवनीत सावल, अतुल देशपांडे, प्रदीप तिवारी, अटल पांडे, शैलेश दहाडराय, सुनील सुभेदार यांच्याकडून दररोज तिघेजण याप्रमाणे आळीपाळीने स्मशानभूमीमध्ये कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सेवा देण्यात येत आहे.