महाविद्यालय प्रवेशाला २८ फेब्रुवारीपर्यंत थांबा; जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचा आदेश

राज्य शासनाने महाविद्यालयातील प्रवेश करण्यासाठी 15 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. विद्यापीठाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाची चर्चा करून प्रवेशाची तारीख निश्चित करायची होती. त्यानुसार जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी 28 फेब्रुवारी पर्यंत महाविद्यालयातील प्रवेशाला थांबा असा आदेश दिला आहे.

    वर्धा (Wardha).  राज्य शासनाने महाविद्यालयातील प्रवेश करण्यासाठी 15 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. विद्यापीठाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाची चर्चा करून प्रवेशाची तारीख निश्चित करायची होती. त्यानुसार जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी 28 फेब्रुवारी पर्यंत महाविद्यालयातील प्रवेशाला थांबा असा आदेश दिला आहे.

    जिल्हाधिकारी पदाचा आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोरोणा संक्रमण काळातील निर्णय जाहीर केला. जिल्ह्यात सध्या कोरोणा संख्या वाढताना दिसत आहेत. हिंगणघाट तालुक्यात कमी वयोगटातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. जिल्ह्यात नजीकच्या काळात रुग्णांची संख्येत क्षणीय वाढ होण्याची शक्यता जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात व्यक्त करण्यात आली. त्यासाठीच कृषक व इतर महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवावे असे आदेश पारित करण्यात आले. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालयाच्या प्रवेशाबाबत विचार करण्यात येईल असे सुद्धा या आदेशात म्हटले आहे.