वर्धा : आज आढळले १० कोरोना संक्रमित रुग्ण ; एकाचा मृत्यू

वर्धा : शुक्रवारी  जिल्ह्यात १० नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. यात वर्धेतील ५, पुलगांव १, कारंजा १, आर्वी १ व समुद्रपुर येथील २ संक्रमितांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३५७ वर गेली आहे. आज एका संक्रमिताचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

शुक्रवारी  पॉझिटीव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये  पुलफैल येथील २३ वर्षीय पुरुष, नालवाडीतील ४० वर्षीय महिला, समता नगर येथील ३७ वर्षीय पुरुष, दयालनगरातील ५४ वर्षीय पुरुष, आनंदनगराती २० वर्षीय पुरुष, पुलगांवच्या झाकीर हुसैन कॉलनी येथील ७२ वर्षीय पुरुष, कारंजा तालुक्याच्या सारवाडी येथील  २९ वर्षीय पुरुष, आर्वीच्या नेताजी वार्डातील  ३१ वर्षीय पुरुष, वायगाव हलद्या येथील ७ महिने व ३ वर्षाचे बालकाचा समावेश आहे. कोरोना तपासणीत निगेटीव्ह आल्याने १०० जणांना आयसोलेशनमधुन सुट्टी देण्यात आली आहे. नव्याने ४५५ जणांना आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले. आज एकूण १५५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यत एकूण ११ हजार ३८ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले. त्यापैकी १० हजार  ६९६जणांचा अहवाल आला असून १० हजार २६६ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर, ३४२ जणांचा अहवाल प्रलंबित आला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३५७ झाली आहे. एका जणाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू  झालेल्यांची संख्या १० वर गेली आहे. अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ९२ झाली आहे. आतापर्यत ४ हजार ६१४  जण होम क्वारंटाईन तर २२० जण इन्स्टिटयूट क्वारंटाईनमध्ये आहे.