वर्धा जिल्हा प्रशासनाला स्थानिक आमदारांचा विसर,या कार्यक्रम पत्रिकेत टाळला उल्लेख

वर्धा: महात्मा गांधींच्या १५१ व्या जयंती सप्ताहाचा कार्यक्रम ८ ऑक्टोबरला हिंदी विद्यापीठात आयोजित  करण्यात आला आहे. हा कार्यक्रम महात्मा गांधी आतंरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय व जिल्हा प्रशासन संयुक्तपणे करणार आहे. या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरु सह पालकमंत्री सुनिल केदार अन्य मान्यवर उपस्थित असणार आहे . या करीता प्रशासनाने कार्यक्रम पत्रिका तयार केली. या पत्रिकेत मात्र स्थानिक आमदार डॅा पंकज भोयर(pankaj bhoyar`s name missing in praogram invitation card) यांच्या नावाचा उल्लेख नाही.

wardha program

वर्धा जिल्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख पत्रिकेत आहे. या पत्रिका सर्वांना निमंत्रण देवुन वितरित सुद्धा झाल्या आहे .उल्लेखनीय असे की, दोन महिन्यांपूर्वी सेवाग्राम विकास आराखड्याच्या एका बैठकीला प्रशासनाने डॅाक्टर भोयर यांना निमंत्रण दिले नव्हते.