Wardha lockdown extended to 18 May

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर होत असलेली गर्दी लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन १८ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या कमी न झाल्याने निर्णय घेण्यात आला आहे.

    वर्धा : जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर होत असलेली गर्दी लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन १८ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या कमी न झाल्याने निर्णय घेण्यात आला आहे.

    यापूर्वी ८ मे सकाळी ७ पासून १३ मे सकाळी ७ पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर आदेशाची अमलबजावणी १३ मेपासून १८ मेपर्यंत करण्यात येईल. ग्राहकांसाठी दुकाने बंद मात्र, सकाळी ७ ते ११ पर्यंत घरपोच पार्सल सेवा सुरु असणारी दुकाने सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई पिठाची गिरणी इत्यादी दुकाने तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने बंद राहतील.

    (कोंबडी, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी यासह), पाळीव प्राण्याच्या खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी सबंधित असणा-या साहित्याच्या निगडीत दुकाने, गॅस एजन्सी अपवाद, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी सकाळी ११ ते रात्री ८, दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

    घरपोच सेवा पुरविणाऱ्यांना आरटीपीसीआर आवश्यक तसेच संबंधित दुकानांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.