मुत्तूट फिनकॉर्प दरोडा प्रकरणाचा छडा लावणा-या पोलिसांचा सत्कार

वर्धेतील मुथ्थुट फिनकॉर्प, गोल्ड लोन फायनान्स कंपनीतील पावणे पाच कोटी रूपयांच्या चोरीचा छडा लावणा-या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार केला.

 वर्धा (Wardha).  वर्धेतील मुत्तूट फिनकॉर्प, गोल्ड लोन फायनान्स कंपनीतील पावणे पाच कोटी रूपयांच्या चोरीचा छडा लावणा-या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार केला.

नगरविकास मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश ब्राम्हणे, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सहायक फौजदार सलाम कुरेशी, पोलिस हेड कॉन्सस्टेबल प्रमोद पिसे, पोलिस कॉन्सटेबल अनिल कांबळे, राजेश यसिंगपुरे, पवन पन्नासे, विकास अवचट, संघसेन कांबळे, अभिजीत वाघमारे यांचा पोलिस अधीक्षक कार्यालयात सत्कार केला.