१५ जूनपर्यंत वर्धा अनलॉक; निर्बंध शिथिल, दुकानांना दुपारी एकपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा सकारात्मक दर (the positive rate of corona virus) 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड (oxygen beds) 40 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असल्याने 15 जूनपर्यंत वर्धा अनलॉक राहणार (Wardha will remain unlocked till June 15) असून काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

  वर्धा (Wardha).  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा सकारात्मक दर (the positive rate of corona virus) 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड (oxygen beds) 40 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असल्याने 15 जूनपर्यंत वर्धा अनलॉक राहणार (Wardha will remain unlocked till June 15) असून काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात दुकानांना सोमवार ते शुक्रवार यादिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिलेल्या आदेशानुसार खालील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यात वर्धा नगरपालिकालगतच्या 11 ग्रामपंचायती, पुलगाव व लगतच्या दोन ग्रामपंचायती नगरपालिका, हिंगणघाट नगरपालिका व लगतच्या 4 ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार यादिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत चालू ठेवण्याची भूमा दिली आहे. जिल्ह्यातील उर्वरित भागात सर्व अत्यावश्यक सेवा तसेच इतर सर्व प्रकारची वस्तू व सेवा यांची दुकाने (फक्त स्वतंत्र, एकल दुकाने, मॉल्स अथवा शापिंग सेंटर नाही) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरु राहतील.

  यापूर्वीही लॉकडाऊनला दोनवेळेस मुदतवाढ दिली होती. 8 मे सकाळी 7 पासून 13 मे सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर लॉकडाऊन 18 मे पर्यंत वाढवण्यात आला. पुन्हा 1 जूनपर्यंत वाढविला तर आता 15 जूनपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत चालू राहील. कोणत्याही ग्राहकाला स्वतः जावून पार्सल घेता येणार नाही. रस्त्याच्या खाद्य पदार्थांच्या विक्रीस मनाई असेल. फेरीवाले, भाजीविक्रेते यांना ठरवून दिलेल्या क्षेत्रामध्येच फिरून व्यवसाय करता येईल. या आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

  दुकानासाठी हे बंधनकारक
  प्रत्येक दुकानदार व ग्राहकांनी मास्क लावणे बंधनकारक राहील. प्रत्येक दुकानासोबत हँड सॉनिटाईझर असणे आवश्यक आहे. दुकानबाहेर सोशल डिस्टिंगच्या खुणा करण्यात याव्या, वेळोवेळी दुकानाचा परिसर निर्जतुकीकरण करावा, दुकानात एका वेळी एकाच ग्राहकाला प्रवेश राहील.

  शनिवारी व रविवारी कडक निर्बंध
  वैद्यकीय सेवा व इतर आणीबाणीच्या परिस्थिती वगळता सोमवारी ते शुक्रवार दुपारी 2 वाजेनंतर तसेच शनिवारी व रविवारी सर्व प्रकारच्या हालचाली व येण्याजाण्यावर कडक निर्बंध असतील.

  शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरु
  कोरोनाविषयक कामे करणा-या आस्थापना, कृषी बँक, मान्सुनपूर्व कामाच्या संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापकांच्या संबंधित यंत्रणा कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. याव्यतिरिक्त शासकीय, निमशासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचारी उपस्थितीसह सुरू राहतील. 25 टक्के जास्त उपस्थितीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणास विनंती केल्यास तशी परवानगी देण्यात येईल.

  पेट्रोलपंप दुपारी १ पर्यंत सुरू
  नागरी व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंप सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु राहतील. दुकानांना पुरवठा केला जाणा-या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत. सर्व उद्योग, व्यवसाय व त्यांच्या कर्मचा-यांना निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक आहे.