बुचाटोला येथे पाणीटंचाई; प्रशासनाने लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी

आदिवासीबहुल व जंगलव्याप्त क्षेत्र अशी ओळख असलेल्या गटग्रामपंचायत बोदलकसा अंतर्गत येणाऱ्या बुचाटोला गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.

    तिरोडा (Tiroda).  आदिवासीबहुल व जंगलव्याप्त क्षेत्र अशी ओळख असलेल्या गटग्रामपंचायत बोदलकसा अंतर्गत येणाऱ्या बुचाटोला गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

    बोदलकसा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुचाटोला गावाची लोकसंख्या 300 आहे. या गावात दोन शासकीय विहिरी व तीन हातपंप आहेत. खासगी लहान-मोठे आठ विहिरी आहेत. मात्र, विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली असून त्यातून गढूळ पाणी येत आहे. हे गढूळ पाणी गावकऱ्यांना प्यावे लागते आहे. त्यामुळे कावीळसारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गढूळ पाण्यापासून गावकऱ्यांना सुटका मिळावी, यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाने पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी व नवीन हातपंप सुद्धा मंजूर करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.