इथेनाॅल निर्मिती आणि शेतकरी नेते विजय जावंधिया
इथेनाॅल निर्मिती आणि शेतकरी नेते विजय जावंधिया

केंद्र सरकार एकीकडे साखर आयात करीत आहे. तर दुसरीकडे निर्यातीवर सबसिडी देण्यात येत आहे. ती रद्द करण्यात यावी. केवळ इथेनॉलच्या निर्मितीने ऊस उत्पादक शेतक-यांच्या समस्या दूर होणार का? असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रातून केला आहे.

वर्धा (Wardha).  केंद्र सरकार एकीकडे साखर आयात करीत आहे. तर दुसरीकडे निर्यातीवर सबसिडी देण्यात येत आहे. ती रद्द करण्यात यावी. केवळ इथेनॉलच्या निर्मितीने ऊस उत्पादक शेतक-यांच्या समस्या दूर होणार का? असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रातून केला आहे.

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी म्हटले की, देशातील उद्योगपतींची संस्था फिकी मध्ये मी आपले संभाषण ऐकले. यात तुम्ही ऊस उत्पादक शेतक-यांच्या अडचणी, त्यांचेकडे असलेल्या उर्वरित रकमेचा उल्लेख केला. सरकारने आता इथेनॉलची निर्मिती करीत 90 टक्के पेट्रोल व डिझेल मध्ये मिसळवुन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऊस उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होणार आहे.

जगातील बाजारपेठेला मंदिपासून संरक्षण देण्यासाठी भारत सरकार ऊस उत्पादक शेतक-यांसाठी वेगळया निर्णयावर अंमलबजावणी करीत आहे. साखरेची आयात करण्यात येत आहे. निर्यात करण्यावर सबसिडी देण्यात येत आहे. साखरेवर बिना व्याजाने कर्ज देण्यात येत आहे. परंतु, हे तिनही निर्णय मागे घेण्याची मी विनंती करतो. आपण देशाचे पंतप्रधान आहात. आपणी जी स्वप्ने दाखवित आहात. त्यावर प्रश्न उभा करणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्या सारखे होईल. जागतिक बाजारात आज 50 डॉलर प्रती बॅरल क्रुड ऑईलची किंमत आहे. 30 ते 35 रूपये लिटर पेट्रोल व डिझेलचे भाव आहे. 30 ते 35 रूपये लिटर इथेनॉलचे दराने शेतक-यांच्या अडचणी दूर होणार काय? असा सवालही जावंधिया यांनी केला आहे.

1 एकरात ऊस उत्पादन घेण्यासाठी किती लिटर डिझेलची आवश्यकता असते. एका एकरातील ऊसापासून इथेनॉल बनविल्यास किती लिटर डिझेलची उर्जा मिळणार आहे. जर 100 लिटर डिझेलच्या उर्जेपासून एक एकरातील ऊस उत्पादन होते. आणि एक एकरातील ऊसापासून जर 100 लिटरच डिझेल तयार होत असेल तर यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांच्या अडचणी दूर होणार काय? असा सवालही जावंधिया यांनी केला आहे.