सावधान! मास्क वापरत नसाल तर एक दिवसासाठी होणार वाहन जप्त

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची गरज आहे. प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मास्कचा वापर न केल्यास तुमचे वाहन एक  दिवसाकरिता जप्त जप्त होऊ शकते.

वर्धा. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची गरज आहे. प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मास्कचा वापर न केल्यास तुमचे वाहन एक  दिवसाकरिता जप्त जप्त होऊ शकते.

आपल्या राज्यात कोरोनाची दूसरी लाट येणार असा अंदाज वर्तवल्या जात आहे, वर्धा शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा याकरिता जागृती आणि कार्यवाही केली जात आहे , त्या अंतर्गत रविवार दिनांक १ नोव्हेंबरपासून मास्कचा वापर न केल्यास वाहन एका दिवसाकरिता जप्त करुन पोलिस स्टेशनला जमा करण्यात येणार आहे.

ही मोहिम महसूल विभाग , पोलिस विभाग आणि नगर पालिका यांच्या सहकार्याने राबवन्यात येणार आहे, तरी सर्व वर्धा शहरातील नागरिकांनी मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करावा आणि स्वतःला , आपल्या कुटुंबाला आणि शहराला कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटे पासून दूर ठेवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान आज शिवाजी चौक येथे मास्कचा वापर न करणाऱ्या ३६ लोकांवर नगरपालिका आणि महसूल पथकाद्वारे कारवाई  करण्यात आली तसेच मास्क घालण्यासाठी सामूहिक शपथ देण्यात आली.