arrest

  • पोलिसांना दिली धमकी

हिंगणघाट (Hinganghat).  दारू विक्रेत्या महिलेवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शस्त्राचा धाक दाखवित आत्महत्या करण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ सप्टेंबर रोजी संत तुकडोजी वार्ड येथे घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

संत तुकडोजी वार्ड येथील अंजू राजू येळणे (४७) नामक महिला अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करते. महिला पोलिस माला मैंद यांच्यासह पीएसआय आगाशे,हमीद शेख, संदीप उईके घटनास्थळी पोहोचले. अंजू राजू येळणे हिला घरी देशीदारू विक्री करतांना रंगेहाथ पकडले. निवासस्थानाचे परिसरात कापडी पिशवीत देशी दारूने भरलेल्या काचेच्या १८० मिलीच्या २० शिशा मिळाल्या. यावरून आरोपी अंजू येळणे हिला पुढील कार्यवाहीकरीता महीला पोलिस कर्मचारी यांचे मदतीने ताब्यात घेतले. आरोपीची मुलगी काजल येळणे हीने धावत आरोपी महिलेजवळ आली व दोघी मायलेकिंनी गोंधळ घालुन पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुद्देमाल हिसकावून घराशेजारी असलेल्या नाल्यांत टाकुन दिला.

काजल येळणे हिने मी यापुर्वी पेटवुन घेतले होते. यानंतर जर माझे घरी आलात तर तुमच्या नावाने खोटी चिट्ठी लिहुन परत एकदा पेटवुन घेईल, अशी धमकी देत धारदार पावशी घेवुन पोलिसांचे अंगावर धावून गेली. आईला जर तुम्ही पोलिस स्टेशनला घेउन गेलात.तर,जिवानीशी ठार मारण्याची धमकीसुद्धा पोलिसांना दिली. सदर घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही महिला आरोपींना ताब्यात घेत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.