अपघातग्रस्त ट्रॅक्टर
अपघातग्रस्त ट्रॅक्टर

समुद्रपूर (Samudrapur): हिंगणघाट येथून राष्ट्रीय महामार्गाने जामकडे जात असलेल्या ट्रॅक्टर, ट्रॉलीचे जुगाड तुटल्याने अपघात झाला. ट्रॅक्टर चालकाच्या सतर्कतने ट्रॅक्टरवर बसलेल्या मजुरांनी वेळीच उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पण, ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात 15 रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडला.

हिंगणघाट येथून सिमेंटच्या विटा भरलेला ट्रॅक्टर जामकडे जात होता. पी.व्ही. टेक्सटाईल कंपनीजवळ अचानक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेले जुगाड तुटल्याने ट्रॅक्टर आणि ट्रॉली वेगळी होऊन अपघात झाला. यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचे नुकसान झाले. ट्रक्टर चालकाच्या सतर्कतेमुळे मजुरांनी वेळीच उडया घेतल्याने ते थोडक्यात बचावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.