प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आष्टी (शहीद) (Ashti Shahid).  वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) तालुक्याच्या साहूर येथील तरुण शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली. गणेश पंजाबराव करडे (30) असे मृतक शेतक-याचे नाव आहे. ही घटना दिनांक 3 जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.

माहितीनुसार साहूर येथील मृतक गणेश करडे शेती व्यवसाय करायचा. त्याच्याकडे वडिलांच्या नावाने कोरडवाहू दोन एकर शेती आहे. शेतीवर बँक ऑफ इंडियाचे एक लाख रुपये आहे. अत्यल्प शेती दरवर्षीची नापिकी त्यातच बँकेचे कर्ज अशा आर्थिक अडचणीमुळे गणेश नेहमीच उदास राहायचा. याबाबत सोबत घरीही चिंता व्यक्त करायचा. अशातच घरातली आर्थिक परिस्थिती अधिकच खालावल्याने त्यांच्या चिंतेत अधिक भर पडली. त्याने घरीच विष प्राशन केले. ही बाब काका गोपाल करडे यांच्या लक्षात येताच त्याला साहूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला वरुडला रेफर केले. मात्र वरुडला जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आष्टी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.पुढील तपास ठाणेदार चांदे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.