suicide in selu

मुलगा पाहायला आल्यानंतर काही वेळाने युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना तालुक्याच्या रेहकी येथे घडली. बेबी सोनटक्के (२२) असे आत्महत्या करणा-या युवतीचे नाव आहे.

सेलू.  मुलगा पाहायला आल्यानंतर काही वेळाने युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना तालुक्याच्या रेहकी येथे घडली. बेबी सोनटक्के (२२) असे आत्महत्या करणा-या युवतीचे नाव आहे.

रेहकी येथील बेबी सोनटक्के हिला मुलगा पहायला आला होता. पाहणीचा कार्यक्रम झाल्यानंतर वडीलाने मुलगा पसंत आहे का? अशी विचारणा केली. यानंतर तिने काही वेळातच विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच तिला सेवाग्राम येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर तिचा २९ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.