कार अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू ; आई गंभीर जखमी

कारचालक तरुणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात 7 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजताचे दरम्यान घडला. यात डॉ. निलिमा नंदेश्वर (२८) यांचा जागीच मृत्यू झाला. आई प्रभा नंदेश्वर (६६) हया जखमी झाल्या आहे.

समुद्रपूर (Samudrapur).  कारचालक तरुणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात 7 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजताचे दरम्यान घडला. यात डॉ. निलिमा नंदेश्वर (२८) यांचा जागीच मृत्यू झाला. आई प्रभा नंदेश्वर (६६) हया जखमी झाल्या आहे.

नागपूर जिल्हयाच्या उमरेड येथील डॉ. निलीमा नंदेश्वर व आई प्रभा नंदेश्वर वरोराकडे जात होत्या. याच दरम्यान डॉ. निलीमा यांचे पाईकमारी शिवारात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याचे कडेला जावुन पलटी झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आई गंभीररीत्या जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस जामचे सहायक पोलिस निरीक्षक भरत क-हाडे, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, अजय बेले, गौरव खरवडे, प्रदीप डोंगरे, सुनील श्रीनाथे व ज्योती राऊत हया घटनास्थळी पोहोचल्या. मृतक व जखमींना वाहनाचे बाहेर काढत ग्रामीण रूग्णालय समुद्रपूर येथे पाठविण्यात आले. समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.